Monday, June 9, 2025
Home मराठी अरेरे! रील बनवणे पडले परीला महागात, बालकलाकार मायरा वैकुळची झाली ‘अशी’ अवस्था

अरेरे! रील बनवणे पडले परीला महागात, बालकलाकार मायरा वैकुळची झाली ‘अशी’ अवस्था

मराठीमधील छोट्या पडद्यावर सध्या अनेक कलाकार सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. यामध्ये मोठ्या कलाकारांसोबतच बालकलाकारही प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. यामधील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी म्हणजेच मायरा वैकुळची (Maira Vaikul) नेहमीच चर्चा होताना दिसत असते. सोशल मीडियावर मायराचे गोड व्हिडिओ तुफान चर्चेत असतात. ज्यामध्ये ती नेहमीच काही ना काही मस्ती करताना किंवा खोडकरपणा दाखवताना दिसत असते. सध्या तिचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोणता आहे तो व्हिडिओ चला जाणून घेऊ. 

झी मराठी वाहिनीवरील तुझी माझी रेशीमगाठ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरताना दिसत आहे. मालिकेची कथा आणि कलाकारांचा अभिनयामुळे ही मालिका टीआरपीमध्येही अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतीलच बालकलाकार परी म्हणजेच मायरा वैकुळ ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मायराचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. ज्यावर तिचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत असतात. सध्या मायराचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

मायराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या रीलमध्ये मायरा डान्स करताना दिसत आहे. यामध्ये ती ट्रेन्डिंग गाण्यावर डान्स करत आहे. डान्स करताना मधेच मायरा कंबर लचकल्यासारखी किंचाळताना दिसत आहे.  हा एक मजेशीर व्हिडिओ आहे. मायराच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मायराच्या या व्हिडिओवर तिच्या गोड अभिनयाचे कौतुक केले आहे. प्रेक्षकांसह मायराच्या या व्हिडिओवर अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

 

दरम्यान झी मराठीवरील तुझी माझी रेशीमगाठ मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांच्याही भूमिका गाजत आहेत. मालिकेला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

हेही वाचा –

घरच्यांच्या विरोधाला न जुमानता धर्म बदलून संसार थाटणारे कलाकार, १३ जणांच्या नावाने यादी फुल्ल

तब्बल ४० लाखांची कार, ५० लाखांचा डायमंड नेक्लेस, वाचा अंकिताला गिफ्टमध्ये काय काय मिळालेलं

कौतुकास्पद! अभिनेत्री तेजश्री प्रधानने घेतला मोठा निर्णय, दान करणार ‘ही’ अनमोल गोष्ट

हे देखील वाचा