Saturday, July 27, 2024

विरुष्काच्या मुलाच्या नावाचा विराटच्या हातावरील टॅटूशी आहे संबंध, जाणून घ्या अकाय नावाचा अर्थ

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. दोघेही पुन्हा आई-वडिल बनले असून त्यांनी मुलाला जन्म दिलाय. अनुष्काने पोस्ट करत आनंदाची बातमी दिली. इतकचे नव्हे तर तिनं पोस्टमधून मुलाच्या नावाचीही घोषणा केली. विरुष्का जोडीनं मुलांच नाव ‘अकाय’ असं ठेवलं आहे. तिच्या या पोस्टनंतर विरुष्का जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच चर्चा सुरु आहे ती म्हणजे विरुष्काच्या मुलाच्या नावाची. विरुष्काने मुलाचे नाव ‘अकाय’ हेच का निवडले याचे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘अकाय’ या शब्दाचा अर्थ ‘निराकार’ असा होतो. ज्याला कोणतंही स्वरुप, देह व आकार नाही असा निराकार. याशिवाय तुर्की भाषेनुसार या नावाचा अर्थ तेजस्वी किंवा चमकणारा चंद्र असा होतो.
दरम्यान, चाहत्यांनी अकाय नावाचा थेट संबंध विराटच्या हातावरील टॅटूशी लावला आहे. अकायचा अर्थ निराकार आहे. भगवान शंकरालादेखील निराकार म्हटले जाते. म्हणजे अकाय हे नाव भगवान शिवाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे भगवान शिवाचे भक्त आहेत. तर विराटने उजव्या हातावर कैलास पर्वतावर ध्यानस्थ शंकराचे चित्र रेखाटले आहे.

काही दिवसांपूर्वी दोघे भगवान शंकराच्या ज्योतिर्लिंगाची पूजा करताना दिसले. याआधीही हे दोघे उज्जैनच्या महाकाल मंदिरात पूजा करताना दिसले होते. आणि अकाय नावाचा संबंध भगवान शिवाशी आहे. चंद्र भगवान शिवाच्या मस्तकावर बसला आहे आणि चंद्र भगवान शिवाच्या अधीन आहे. त्यामुळे विरुष्काने मुलाचं नाव अकाय ठेवले आहे. असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही. मात्र अद्याप विरुष्का जोडीनं यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

हे देखील वाचा