Sunday, December 3, 2023

मधुचंद्राच्या रात्री असा सजवला होता स्वरा भास्करचा बेड, फोटो शेअर करून आईला दिले श्रेय

अभिनयासोबतच आपल्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नाबाबत माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी स्वराने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेजचे फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. अशात आता स्वराने पुन्हा एकदा तिच्या हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून दहशत निर्माण केली आहे. स्वत: स्वराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर हे फोटो शेअर केले आहेत. जे पाहिल्यानंतर तुम्हीही लाजून लाल व्हाल.

स्वरा भास्कर (swara bhaskar) हिने तिच्या अधिकृत इन्स्टा अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून तिची प्रेमकहाणी कशी सुरू झाली हे सांगितले. त्याचबरोबर स्वराने तिच्या हनीमूनचे फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बेड फुलांनी सजलेला दिसत आहे, ज्यामध्ये गुलाब आणि पांढऱ्या फुलांचा समावेश आहे.

swara bhaskar
Photo Courtesy: Instagram/reallyswara
swara bhaskar
Photo Courtesy: Instagram/reallyswara

स्वरा भास्करने इंस्टा स्टोरीमध्ये सांगितले की, “तिच्या बेडची संपूर्ण सजावट तिच्या आईनेच केली होती. कारण, तिच्या आईची इच्छा होती की, तिचे आयुष्य फिल्मी पद्धतीने सुरू व्हावे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

स्वरा भास्करने कोर्ट मॅरेजचे फोटो शेअर करताच तिला माेठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. कारण, स्वराने ज्याच्याशी लग्न केले होते त्याला ती आधी तिचा भाऊ म्हणायची. स्वराने तिच्या लग्नात सी मरून कलरची साधी साडी नेसली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. कोर्ट मॅरेजनंतर स्वराने एक छोटी पार्टीही आयोजित केली होती, ज्यामध्ये तिने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित केले होते. यासोबतच स्वरा म्हणाली होती की, ‘मार्चमध्ये तिचे राॅयल वेडिंगही होणार आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

34 वर्षीय स्वरा भास्करने 2010 मध्ये ‘गुजारिश’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, 2011 मध्ये आलेल्या ‘तनु वेड्स मनू’ या चित्रपटाने तिला जबरदस्त ओळख दिली.(bollywood actress swara bhaskar fahad ahmad suhagrat first night private photos viral fans shocked to see)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जया बच्चन पॅपराझींसाेबत दिसल्या मस्ती करताना; पाेज देत म्हणाल्या, ‘बघा मी किती…’

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला नवाजवर मोठा आरोप, मध्यरात्री मुलांसह काढले तिला घराबाहेर

हे देखील वाचा