सख्ख्या भावाबरोबरच ‘या’ अभिनेत्रीने केला होता ऑनस्क्रीम रोमान्स, अनेकांनी केली होती पोस्टरची होळी


बॉलिवूड विश्वात अशी काही घराणी आहेत, ज्यांनी मिळून बॉलीवूडला एक वेगळीच ओळख मिळवून दिली आहे आणि आपल्या स्वतःचेही नाव खूप मोठे केले आहे. यातीलच कपूर घराणे आणि मेहमूद घराणे यांनी खऱ्या अर्थाने बॉलीवूडमध्ये शान आणली, असे म्हणायला हरकत नाही. अशाच या मेहमूद घराण्यातील व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक विनोदी कलाकार ज्यांना चित्रपटाच्या नायकापेक्षा जास्त फी मिळत असे, त्यांचे नाव होते मेहमूद. जवळपास त्यांचे संपूर्ण कुटुंब चित्रपटांत होते. फारच थोड्या लोकांना माहिती असेल की, महमूद यांच्याप्रमाणे त्यांची बहीणही हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तर आज थोडक्यात जाणून घेऊयात मीनू मुमताज त्यांचा आजवरचा प्रवास.

हि कहाणी आहे, एका वेगळ्या अभिनेत्री आणि नृत्यांगनाची,ज्यांचे नाव आहे मल्लिका बेगम म्हणजेच मिनू मुमताज. मीनू मुमताज यांचा जन्म २६ एप्रिल १९४२रोजी झाला होता. मीनू यांना लहानपणापासूनच कलेची आवड होती. यासाठी त्यांनी नृत्य प्रशिक्षण घेतले होते. आपल्या वडिलांच्या व्यसनी सवयीमुळे, त्यांच्या घरची परिस्थिती बिघडत चालली होती, म्हणून मिनू मुमताज यांना नाईलाजाने सिनेजगातात यावे लागले होते. येथूनच सुरु झाला, त्यांचा चित्रपट सृष्टीतील प्रवास.

देविका राणी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मीनू मुमताज यांना पहिला ब्रेक दिला होता. बॉम्बे टॉकीजमध्ये त्यांनी नृत्यांगना, म्हणून मीनू मुमताज यांना कामावर घेतले होते. मीनू यांनी १९५५ मध्ये ‘घर घर ’ या चित्रपटातून दिवाळीपासून करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्यांनी गावात राहणाऱ्या नर्तकीची भूमिका साकारली होती. पण, त्यांना खरी ओळख मिळाली, ते सखी हाथीम या चित्रपटापासून. यात त्यांनी एका जलपरीची भूमिका केली होती, जी खुप नावाजली गेली होती.

१९५८च्या हावडा ब्रिज या चित्रपटात, मीनू मुमताज यांनी त्यांचा सख्खा भाऊ महमूद यांच्यासोबत प्रणय (रोमांस) केला होता. त्या वेळी बहीण-भावांच्या ऑनस्क्रीन रोमान्समुळे अनेक जण संतापले होते. पण या चित्रपटात मीनू मुमताज यांची जोडी विनोदी जॉनी वॉकर यांच्याबरोबर खूप चांगली जमली होती. त्यानंतर या दोघांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. मीनू यांनी विनोदी भूमिकांव्यरिक्त, अनेक सहअभिनेत्रीच्याही भूमिका केल्या आहेत.

मीनू मुमताज यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी १९६३ मध्ये चित्रपट दिग्दर्शक सय्यद अली अकबर यांच्यासोबत लग्न केले आहे. एक दिवस अचानक मीनू यांची दृष्टी गेली व त्यांची स्मृतीही गेली होती. ज्यानंतर डॉक्टरांनी असे सांगितले की, त्याच्या मेंदूत १५ वर्षांपासून ट्यूमर आहे. त्याचे ऑपरेशन करून, त्यांचे प्राण आज वाचले आहेत. त्या सध्या कॅनडामध्ये राहत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.