‘अच्छा चलता हू, दुआ मे याद रखना’; ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर मीम्सला उधाण

0
77

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि आलिया भट्ट (ALia bhatt) यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 8 सप्टेंबर रोजी या चित्रपटाचे स्क्रिनिंग प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आले होते. स्क्रिनिंगमध्ये चित्रपट पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी चित्रपटाचे कौतुक केले, तर अनेकांना चित्रपट आवडला नाही. त्याचवेळी, आज ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज झाल्यानंतर, सोशल मीडियावर युजर्सनी मीम्सचा वर्षाव केला आहे. अनेक यूजर्स तर या चित्रपटाला फ्लॉप म्हणत आहेत. हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. अशातच काही मजेशीर प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ब्रह्मास्त्र चित्रपट बघितल्यानंतर सोशल मीडियावर यूजर्स वेगाने रिव्यू देत आहे. काही चित्रपटाच्या वीएफएक्सवर कमेंट करताना दिसले तर काहींना शाहरुख खानची भूमिका पसंत नाही आली. एका युजर्सने आपली प्रतिक्रिया देत लिहिले, “अखेर चित्रपट बघितला, पटकथा सर्वात खराब स्तराची अपेक्षा नव्हती, कथा निशानावर नाही आहे.

एका युजरने चित्रपटाच तिकीट पोस्ट करत लिहिले की, “करण जोहर माझे पैसे परत कर, ब्रह्मास्त्रने मला निराश केले. तर एका युजरने मजेशीर प्रतिक्रिया देत लिहिले – माहीत नाही चित्रपटाने कुठे मार खाल्ला. तेच अजून एका युजर्सने लिहिले -“ओह हे काय बघितलं”.

एका चाहत्यांने रणबीर कपूरच्या ‘ए दिल है मुश्किल’ या गाण्याचे बोल ‘अच्छा चलता हूं दुआओं में याद रखना’ लिहिले. एका युजर्सने लिहिले – “यावेळी बॉलिवूडची अशी स्थिती आहे की – मला गिवअप करायचे आहे, परंतु ते माझ्याकळून होत नाही आहे. तर एक युजर्स ब्राम्हस्त्र चित्रपटाची तुलना जानी दुश्मन या चित्रपटासोबत करत होता. अयान मुखर्जीच्या या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, मौनी रॉय नागार्जुन और शाहरुख भी हैं।
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-

विमानतळावर अचानक धावायला लागली अभिनेत्री काजोल, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
बाप्पांच्या दर्शनासाठी बॉलिवूड कलाकार ‘वर्षा’ वर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी साधला संवाद
समंथा दिसणार प्रेग्नंट लेडीच्या भूमिकेत; अ‍ॅक्शन, थ्रिलर, सस्पेंसने भरलेला ‘यशोदा’चा ट्रेलर आला समोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here