Friday, April 19, 2024

आलिया भट्टच्या यशावर ऐश्वर्या रायचा माेठा खुलासा; म्हणाली, ‘तिला करणचा सपाेर्ट अन्…’

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने (Alia bhatt) 2012 साली करण जोहर (Karan johar) ‘उडता पंजाबट यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला देऊन फार कमी कालावधीत आपल्या अभिनयाने आणि साैंदर्याने प्रेक्षकांच्या ह्रदयात स्थान निर्माण केले. त्याचप्रमाणे यावर्षी आलियाचा आलेला ‘गंगूबाई काठियावाड़ी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने आलियाला खुप पॉपुलरिटी मिळाली. पण या दरम्यान आलिया संदर्भात साेशल मीडियावर ऐश्वर्या रायचं जुनं विधान प्रचंड व्हायरल हाेत आहे. 
ऐश्वर्या रायचा (Aishwarya Rai)  2018 साली ‘फन्ने खान’ हा चित्रपट आला हाेता. या चित्रपटादरम्यान तिने माध्यमांना एक मुलाखत दिली हाेती. ज्यामध्ये तिने आलिया भट्ट (Alia Bhatt) हिच्या यशाबद्दल बोलली हाेती. त्याचवेळच म्हणजेच चार वर्षा आधीचं ऐश्वर्याच हे वक्तव्य चांगलचं चर्चेत आल आहे.
आलिया विषयी बाेलताना ऐश्वर्या म्हणाली, “आलिया खुप पुढे जाईन. ती छान काम करत आहे. ती आपल्या कामाला एक्सप्लोर करत आहे, एंजॉय करत आहे, जे की याेग्य आहे. आलियाला करिअरच्या सुरुवातीपासुन करण जाेहरचा सपाेर्ट मिळाला. आणि ही बाब मी स्वत: आलियाला म्हटली आहे की, ज्याप्रकारे तुला करणचा सपाेर्ट मिळत आहे, त्याने करीयर बनवन खूप सोपे हाेतं, त्याचा तुला खूप फायदा होईल, तुला अनेक संधी मिळतील.” ऐश्वर्या पुढे म्हणाली, आलियाला एका नंतर एक संधी मिळत आहे आणि त्याचबराेबर ती छान काम करत आहे.
या दाेन्ही अभिनेत्रीच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले तर, ऐश्वर्या रायचा ‘पोन्नियन सेल्वन’ ह्या चित्रपटाच ट्रेलर जारी झाल आहे. तर आलीया भट्टच ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट 9 सप्टेंबर राेजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
पार्वती मातेची भूमिका साकारत असताना स्टेजवरच आला मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
‘आशिकी 3’ मध्ये कार्तिक आर्यनसोबत काम करण्यासाठी अभिनेत्रींमध्ये चढाओढ, ‘या’ नावांची होतेय सर्वाधिक चर्चा
कॅटरिनाच्या ‘या’ सवयीने वैतागला अभिनेता इशान खट्टर; म्हणाला, ‘तिच्याशी बोलणे म्हणजे भिंतीशी…’

हे देखील वाचा