Wednesday, July 3, 2024

‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटातील ‘नजर तेरी तुफान’ गाणे रिलीझ, कतरीना आणि विजय सेतुपतीच्या केमिस्ट्रीने लावली आग

कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर ‘मेरी ख्रिसमस’ लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर याआधीच रिलीज झाला आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित या थ्रिलर चित्रपटात राधिका आपटे, संजय कपूर यांसारखे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रेक्षकांना आकर्षित करत निर्मात्यांनी आज चित्रपटातील ‘नजर तेरी तुफान’ हे गाणे रिलीज केले आहे.

‘मेरी ख्रिसमस’चे दुसरे गाणे ‘नजर तेरी तुफान’ आज 4 जानेवारी रोजी रिलीज झाले आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांची जबरदस्त केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळते. ‘नजर तेरी तुफान’मध्ये कतरिना आणि विजय कधी प्रेम करताना दिसतात तर कधी भांडण करताना. या गाण्यात दोघांच्या प्रेमकहाणीचे वर्णन करण्यात आले आहे.

हे स्लो मोशन गाणे वरुण ग्रोव्हरने संगीतबद्ध केलेले आहे. संगीत दिग्दर्शक प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला पापोनने आवाज दिला आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्यातील प्रेम या गाण्यात दाखवण्यात आले आहे. ते दोघे मिळून कागदाची बोट बनवतात आणि नंतर ती एकत्र जाळतात. अवघ्या काही मिनिटे चाललेल्या या गाण्यात दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली.

या गाण्यात कतरिना विजय सेतुपतीसोबत काही सेकंद रोमान्स करताना दिसली. या गाण्यात कतरिना खूपच सुंदर दिसत आहे. हे गाणे चाहत्यांना खूप आवडते. हे गाणे रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. कॅटरिना कैफ आणि विजय सेतुपती यांना मोठ्या पडद्यावर स्क्रिन शेअर करताना पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा ‘मेरी ख्रिसमस’ हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. कतरिना कैफ आणि साऊथचे विजय सेतुपती या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण तामिळ आणि हिंदीमध्ये एकाच वेळी झाले आहे. याशिवाय संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा काझमी या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात राधिका आपटेचा कॅमिओ आहे. चित्रपटाच्या तमिळ आवृत्तीतील सहाय्यक कलाकार वेगळे आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

पंकज त्रिपाठी यांनी व्यक्त केली अयोध्येतील राम मंदिरात जाण्याची इच्छा; म्हणाले, ‘मी कुटुंबासोबत जाणार’
कंगना रणौतने केले ’12 Fail’ चित्रपटाचे कौतुक; म्हणाली, ‘मी एवढी कधीच रडले नाही’

हे देखील वाचा