पॉर्न इंडस्ट्रीतील कमी काळात मोठे नाव कमावणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मिया खलिफा हिचाही समावेश होतो. मात्र, मिया या दुनियेपासून लांब गेली आहे. ती तिच्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. यावरून ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांचे लक्ष वेधत असते. तिच्या पोस्ट चाहत्यांना खूप आवडतात. अशात तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने महागडा ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. ड्रेसची रक्कम वाचून प्रत्येकाच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.
मिया खलिफा (Mia Khalifa) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरीमध्ये एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती एका ड्रेसच्या दुकानात साडेपाच लाखांचा गाऊन परिधान करून बोल्ड पोझ देताना दिसत आहे. यामध्ये ती तिची नागमोडी कंबर हलवताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अशा खोट्या आत्मविश्वासाची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मी कोण आहे, असे तुम्हाला वाटते?”
काळ्या रंगाच्या थाय हाय स्लिट गाऊनमध्ये दिसली मिया खलिफा
या व्हिडिओत मिया खलिफाने काळ्या रंगाचा थाय हाय स्लिट गाऊन परिधान केला आहे. यामध्ये तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत. तसेच, ती बोल्ड अंदाजात पोझ देताना दिसत आहे. मियाने इंस्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. यामध्ये तिने लिहिले होते की, “हा ड्रेस साडे पाच लाख रुपयांचा वाटतो का?”

तब्बल २ कोटींहून अधिक मिया खलिफाला करतात फॉलो
मिया खलिफा हिचा सोशल मीडियावर चांगलाच मोठा वावर आहे. ती नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडिओ शेअर करते. मात्र, यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. याचा तिच्यावर कोणताही परिणाम होत नाही. मिया तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. तिला इंस्टाग्रामवर २ कोटी ७० लाख चाहते फॉलो करतात. त्यामुळेच कदाचित तिच्या पोस्टला लाखो लाईक्स मिळतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अभिनेत्रीशी लग्न केल्याचा परिणाम’, विराटच्या डिप्रेशनवर केआरकेचे धक्कादायक वक्तव्य; ट्वीटही केले डिलीट
‘मला कशाचीही पर्वा नाही…’, 24 वर्षांचा संसार मोडत स्पष्टच बोलली सोहेल खानची एक्स पत्नी
सुनिल शेट्टीच्या प्रसिद्ध गाण्यावर ‘या’ व्यक्तीने ट्रेडमिलवर केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ आला समोर