Monday, June 9, 2025
Home अन्य ‘मिया खलिफा’चा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, ट्वीट करत थेट सरकारला केला प्रश्न; पाहा काय म्हणतेय ती

‘मिया खलिफा’चा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, ट्वीट करत थेट सरकारला केला प्रश्न; पाहा काय म्हणतेय ती

मागच्या ७० दिवसांपासून दिल्लीमधील शेतकरी आंदोलन संपूर्ण देशात गाजत आहे. मात्र, आता या आंदोलनाने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या लोकांचे देखील लक्ष वेधून घेतले आहे. पॉप स्टार रिहाना, पर्यावरणप्रेमी ग्रेटा थनबर्ग यांनी या आंदोलनांबद्दल ट्वीट करत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. आता या आंदोलनावर माजी पॉर्नस्टार मिया खलिफाने देखील पोस्ट करत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

मियाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, ” त्यांनी दिल्लीजवळचे इंटरनेट बंद केले, अशा कोणत्या मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे?’ यासोबतच तिने या आंदोलनकर्त्यांचा ‘शेतकऱ्यांना मारू नका’ असे लिहिलेले पोस्टर हातात घेतलेला एक फोटो देखील ट्वीट केला आहे.

मियाच्या या ट्विटला काही नेटकरी पाठिंबा देत आहे, तर काही तिला तिचे काम आठवायला सांगत आहे. यानंतर मियाने लगेच दुसरे ट्वीट केले ज्यात ती म्हणते, “मी शेतकऱ्यांसोबतच उभी आहे.’

कोण आहे मिया खलिफा?
मिया खलिफाचा जन्म लेबनानचा. मात्र, ती काही वर्षांनी अमेरिकेमध्ये वास्तव्यास गेली. पदवी संपादन करून ती नोकरीच्या शोधात असताना तिला कोणीतरी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास विचारले. त्यानंतर मियाने तिचे करियर पॉर्न इंडस्ट्रीमध्ये घडवले. त्या इंडस्ट्रीमध्ये काम सुरु केल्यानंतर दोनच महिन्यात ती पॉर्न इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त सर्च झालेली स्टार बनली. मियाच्या या कामामुळे तिच्या घरच्यांनी देखील तिच्याशी नाते तोडले.

तिच्या अनेक व्हिडिओंमुळे ती वादांमध्ये सुद्धा अडकली होती. मियाने तिचा एक व्हिडिओ केला होता ज्यात ती हिजाब घालून काही हरकती करत होती. या व्हिडिओमुळे पूर्व मध्य देशांमध्ये तिच्यावर प्रचंड टीका झाली. तिला जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या होत्या. असे असूनही मिया काही वर्षांपूर्वी पॉर्न इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय स्टार होती. मात्र, तिने तिच्या लग्नाच्याआधी या इंडस्ट्रीला अलविदा म्हटले.

मियाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘मला ही इंडस्ट्री सोडून अनेक वर्ष झाले, पण अजूनही मी मोकळेपणाने माझे आयुष्य जगू शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा लोकं मला बघतात, तेव्हा मला जाणवते की त्यांच्या नजर माझ्याकपड्यांमधून आरपार जात आहे.’

मिया सध्या वेबकॅम मॉडेलिंग करते. सोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे व्हिडिओ, फोटो पोस्ट करत असते. मियाला चालू घडामोडींमध्ये देखील खूप आवड आहे. ती नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगात घडणाऱ्या गोष्टींवर पोस्ट करत असते.

हेही वाचा-

शेतकरी आंदोलनावर ट्विट करत संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारी रिहाना आहे तरी कोण?

कंगना पुन्हा मैदानात, केलं अतिशय वादग्रस्त गोष्टीचं समर्थन

सध्या संपुर्ण देशात चर्चेत असलेला, शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप झालेला दिप सिद्धू आहे तरी कोण?

हे देखील वाचा