सध्या संपुर्ण देशात चर्चेत असलेला, शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप झालेला दिप सिद्धू आहे तरी कोण?


प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली सुरु असताना, अचानक त्यात गोंधळ आणि हिंसा सुरु झाली. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यांवर शेतकऱ्यांनी खूप गोंधळ झाला. त्यातल्या काही आंदोलनकारी लोकांचा एक ग्रुप लाल किल्ल्यावर गेला आणि तिथे मोठा गोंधळ घातला. शिवाय लाल किल्यावर निशान साहिब आणि शेतकरी-मजूर एकतेचे दोन झेंडे देखील फडकवले गेले. या सर्व घटनांचा शेतकऱ्यांनी विरोध केला असून या हिंसेचा आणि हिंसा भडकवण्याचा आरोप काही मोजक्या लोकांवर आणि दीप सिद्धू याच्यावर केला आहे.

दीप सिद्धूने एका फेसबुक लाईव्हमध्ये या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. तो पुढे म्हणाला, ” हे आंदोलन करताना आम्ही कुठल्याही व्यक्ती किंवा सरकारी संपत्तीचे नुकसान केले नाही किंवा दिल्लीला जाऊन असे काही करण्याचा आमचा उद्देश नव्हता. आमच्याजवळ कोणत्याही प्रकारचे शस्त्र नव्हते. आम्ही फक्त आमचे झेंडे उचलले आणि ट्रॅक्टरने दिल्लीला गेलो. लोकांनी आम्हाला आणि इतर आंदोलनकर्त्यांना जातीयवादी किंवा अतिरेकी म्हणू नका. आम्ही आमचा झेंडा फडकवताना लाल किल्ल्यावर फडकवलेल्या तिरंग्याला बिलकुल हटवले नाही. आम्ही फक्त शेतकरी-मजूर एकता आणि निशान साहिबचा झेंडा फडकवला.”

अचानक या हिंसेमुळे चर्चेत आलेला दीप सिद्धू नक्की आहे तरी कोण जाणून घेऊया.
दीप सिद्धू यांचा जन्म १९८४ मध्ये पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यात झाला. दीपने वकिलीचा अभ्यास केला असून, त्याला किंगफिशर मॉडेलचा पुरस्कारही मिळाला आहे. २०१५ साली दीप त्याच्या पहिल्या पंजाबी चित्रपट ‘रमता जोगी’ मध्ये दिसला. त्यानंतर दीपची लोकप्रियता २०१८ साली आलेल्या जोरा दस नंबरिया या चित्रपटातुन अधिकच वाढली. या चित्रपटात त्याने एका गॅगस्टरची भूमिका केली होती.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी भाजपा खासदार सनी देओल यांनी दीप सिद्धूला गुरदासपूरमधील त्यांच्या निवडणूक प्रचारात सामील करून घेतले होते. लाल किल्ल्यावर हंगामा झाल्यानंतर भाजपा खासदार स्वतःला दीपपासून दूर करू लागले. सनी देओल यांनी सुद्धा ट्विट करत म्हटले आहे की, “गेल्या 6 डिसेंबर रोजी मी म्हणालो होतो की दीप सिद्धूशी माझे आणि माझे कुटुंबियांचा काही संबंध नाही”.

सप्टेंबर २०२० पासून दीप सिद्धू शेतकरी आंदोलनात सहभागी झाला होता, आणि थोड्याच कालावधीत त्याने सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. या चळवळीत दीप शंभू सीमेवर शेतकर्‍यांसह बसलेला दिसला होता. शेतकरी चळवळीत दीप सिद्धू यांच्या सहभागावर अनेक शेतकरी नेत्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.