अवघ्या काही दिवसांनी बॉलिवूडचा बॅचलर सिंगर मिका सिंग (Mika Singh) त्याच्या आयुष्याची छान सुरुवात करणार आहे. मिका सिंगचा शो ‘स्वयंवर: मिका दी वोहटी’ सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये अनेक मुलींनी भाग घेतला होता. त्यापैकी एक म्हणजे कॉमेडियन व्हीआयपीची मुलगी ध्वनी पवार. ध्वनीने शेवटपर्यंत शोमध्ये आपली जागा बनवली होती आणि मिका सिंगसोबत खास बॉन्ड शेअर केला होता. मात्र, आता ती शोमधून बाहेर झाली आहे.
मिका सिंगला कसा जोडीदार हवा आहे?
शोमधून बाहेर पडल्यानंतर ध्वनी पवारने मिका सिंगच्या शोबद्दल एका लेटेस्ट मुलाखतीत अनेक खुलासे केले. दिलेल्या मुलाखतीत ध्वनी पवारने मिका सिंगला त्याच्या लाइफ पार्टनरमध्ये कोणते गुण हवे आहेत, हे सांगितले आहे. ध्वनी म्हणते की, त्याला एका समंजस जोडीदाराची गरज आहे. ध्वनीच्या म्हणण्यानुसार, “मीका सिंग खूप मेहनत करून या टप्प्यावर पोहोचला आहे, त्यामुळे त्याला समजूतदार जीवन साथीदाराची गरज आहे. त्याला समंजस जोडीदाराची गरज आहे.” याशिवाय मिका खूप भावूक असल्याचंही ती म्हणाला. (mika di vohti contestant dhwani pawar talk about mika singh partner)
ध्वनी पवार का झाली होती शोमध्ये सामील?
ध्वनी पवारचे मिका सिंगवर नेहमीच प्रेम होते आणि म्हणूनच तिला या शोचा भाग व्हायचे होते. मात्र, अनेक लोक तिला म्हणायचे की, ती या शोचा भाग बनली कारण तिला लोकप्रिय व्हायचे होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा