Tuesday, June 10, 2025
Home बॉलीवूड नॅशनल टेलिव्हिजनवर स्वयंवर रचून मिका सिंग निवडणार त्याची सहचारिणी, वाचा संपूर्ण माहिती

नॅशनल टेलिव्हिजनवर स्वयंवर रचून मिका सिंग निवडणार त्याची सहचारिणी, वाचा संपूर्ण माहिती

नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला गायक मिका सिंग यावेळी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. त्याच्या गाण्यापेक्षा विवादाने चर्चेत असणारा मिका सिंग आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार मिका सिंग लवकरच नॅशनल टेलिव्हिजनवर त्याचे स्वयंवर रचणार आहे. स्वयंवर करून आपल्या आयुष्याच्या जोडीदार शोधणाऱ्या कलाकारांच्या यादीत आता मिका सिंग हे नाव सामील होणार आहे.

बॉलिवूडचाप्रसिद्ध गायक आता एका रिऍलिटी शोमधून तिची पत्नी शोधण्याचा तयारीत आहे. याबाबत त्याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, “हा रिऍलिटी शो एका स्वयंवराप्रमाणे असणार आहे. जो काही महिन्यातच प्रसारित केला जाणार आहे.”

तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिका या शोमध्ये लग्न करणार नाही तर केवळ साखरपुडा करणार आहे. मिका सिंग या शोमध्ये भाग घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. या शोमध्ये देशभरातून अनेक स्पर्धक सामील होणार आहेत.

मिका सिंग नॅशनल टेलिव्हिजनवर स्वयांवराचे आयोजन करणारा काही पहिला कलाकार नाही. याआधी देखील नॅशनल टेलिव्हिजनवर स्वयंवर झाले आहे. यात रतन राजपूत, राखी सावंत आणि मल्लिका शेरावत यांनी देखील त्यांचे नॅशनल टेलिव्हिजनवर स्वयंवर केले आहे. परंतु तिघींनी ही त्याच्या पार्टनरसोबत लग्न केले नाही.

परंतु राहुल महाजनने या शोमधून २५ वर्षाच्या बंगाली मॉडेल डिंपी गांगुलीला त्याची पार्टनर म्हणून निवडले होते.‌ त्यांनी लग्न देखील केले होते. परंतु लग्नाच्या ५ वर्षानंतर म्हणजेच २०१५ साली ते वेगळे झाले.

हेही वाचा :

हे देखील वाचा