Sunday, April 14, 2024

“ब्रिटिशांच्या काळामध्ये आजोबा घोड्यावरून फिरायचे” मिलिंद गवळी यांनी शेअर केलेली ‘ती’ खास पोस्ट ठरते लक्षवेधक

तसे पाहिले तर आजच्या काळात आपल्या घरात एखादा पाळीव प्राणी पाळणे म्हणजे एका व्यक्तीला संभाळण्यासारखेच आहे. सामान्य माणसाला तर आपल्या खिशाला कात्री लावून ही गोष्ट करावी लागेल. जरी ही बाब सर्वांना करणे जमत नसले तरीही प्रत्येकाच्या मनात कोणत्या ना कोणत्या प्राण्याबद्दल एक खास जागा असते. मग कुत्रा, असो मांजर असो कोणीही असो त्या प्राण्याबद्दल विशेष प्रेम असते. कधी त्या व्यक्तीचे प्रेम दिसून येते कधी नाही. आपण जर मनोरंजनविश्वात पाहिले तर अनेक कलाकारांकडे कुत्रा आणि मांजर दिसून येतात.

मात्र यासर्वांमधे अभिनेते मिलिंद गवळी यांची आवड जरा वेगळी आहे. मिलिंद यांचा आवडता प्राणी चक्क घोडा आहे. आई कुठे काय करते या मालिकेतून न भूतो न भविष्यती अशी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवणारे मिलिंद गवळी सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय आहेत. त्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी त्यांच्या प्राण्यांच्या प्रेमाबद्दल आणि खासकरून त्यांच्या घोड्याच्या प्रेमाबद्दल सांगितले आहे, सोबतच आजोबांच्या घोडयाची देखील एक आठवण सांगितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “आनंद
आपल्याला कशात आनंद मिळतो, काय केलं म्हणजे आपण आनंदी असतो, प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या असतात, काय ना खाण्यापिण्यामध्ये आनंद मिळतो, काय ना प्रेमाची माणसं भेटली की आनंद मिळतो, काही ना मनासारखे पैसे मिळाले की आनंद मिळतो, मला सुद्धा या सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर आनंद मिळतो पण पण तितका नाही जितका मला मनासारखं काम करून मिळतो,
मला प्रसन्न माणसं भेटली, निस्वार्थी माणसे भेटली की नक्की आनंद म्हणतो, त्याचबरोबर मला वेगवेगळ्या प्राण्यांना भेटून सुद्धा खूप आनंद मिळत असतो, आणि त्यात घोडा हा प्राणी तो माझ्या फारच आवडीचा आहे, घोड्याला बघितलं तरी मला फार आनंद मिळतो,
अगदी काही वर्षांपूर्वी घोड्याशिवाय प्रवास होऊच शिकायचा नाही जर प्रवास करायचा असेल तर तो फक्त घोड्यावरच करावा लागायचा, त्या काळामध्ये घोडा हा एक फॅमिली मेंबर किंवा कुटुंबाचा भागच असणार नक्कीच,
माझे आजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे वडील श्री अश्रू गवळी हे ब्रिटिशांच्या काळामध्ये पोलीस खात्यामध्ये जमादार होते, आणि त्यांच्याकडे एक घोडा होता, मी फार लहान असताना माझे आजोबा भारी, त्यांच्याकडे असलेला घोडा मी कधी पाहिला नाही, पण माझ्या वडिलांच्या तोंडून मी बरेच वेळेला त्या घोड्याविषयी माझ्या लहानपणापासून ऐकत असे, कळवण तालुक्यामध्ये आबोना या चौकीमध्ये त्यांचं पोस्टिंग होतं, तिकडे घर त्यांनी भाड्याने घेतलं होतं त्या घराच्या मागे तबेला होतात त्या तबेल्यात घोड्याला राहायची व्यवस्था होती, त्या घराचं भाडं होतं दोन रुपये.
माझे आजोबा कसे घोड्यावरून फिरायचे, कसे ते घोड्याची काळजी घ्यायचे, कदाचित तेव्हापासूनच माझ्या बालमनावर घोड्या विषयी कुतूहल निर्माण झाले असावे आणि आपण सुद्धा एक दिवस घोडा घ्यायचा असं कुठेतरी अंतर्मनामध्ये ठरवून टाकलं होतं.
मुंबई शहरांमध्ये राहून आपण घोडा घ्यावा, आणि तो आपल्या बिल्डिंगच्या खाली पार्किंग मध्ये त्याची व्यवस्था करावी,
असं अनेकदा मनामध्ये येऊन गेलं होतं.
Practical आयुष्य जगत असताना आपण आपल्या अंतर्मनातल्या सुप्त इच्छा कधीही बाहेर येऊ देत नाही, घोडा घेण्याबाबतीत माझं कदाचित तसंच झालं असावं,
पण घोडा हा प्राणी पाहिल्या पाहिल्या माझं मन भरून जातं मला खूप आनंद होतो, तो आनंद काही अंतर्मनात राहत नाही तर तो बाहेरही पडतो, त्या घोड्याशी मैत्री करावीशी वाटते त्या गोड्याशी बोलावसं वाटतं त्याला खाऊ घालावं असं वाटतं त्याच्यावर बसून फेरफटका मारावासा वाटतो, कदाचित त्या आनंदाचाच एक खूप मोठा भाग आहे,
घोडा चालवण्याची एकही संधी आजपर्यंत मी सोडली नाही आहे.”

दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूपच गाजत आहे. यावर अनेकांनी कमेंट्स तर त्यांच्या या प्राणी प्रेमाचे देखील कौतुक केले आहे. यासोबतच काहींनी तर त्यांना त्यांच्या या पोस्टवर त्यांच्या भूमिकेवरून फटकारले देखील आहे. एकूणच काय तर नेटकाऱ्यानी मिलिंद यांची ही पोस्ट खूपच आवडली आहे. या पोस्टसोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यात ते घोड्यासोबत वेळ घालवताना दिसत आहे. अनेक नेटकाऱ्यानी मिलिंद यांना कमेंट्स करत त्यांच्या फिटनेसबद्दल देखील विचारले आहे.

हे देखील वाचा