बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या गोष्टीची माहिती त्यांनी सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना दिली होती. परंतु नुकताच त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहेत. तसेच त्यांची पत्नी अंकिता हिचा देखील कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी त्यांनी सगळ्यांना दिली आहे. यानंतर ते त्यांच्या जुन्या अंदाजात परतले आहेत. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, आणि आता त्यांना कसं वाटत आहे याबद्दल माहिती दिली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मिलिंद सोमण यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ते धावताना दिसत आहेत. त्यांनी केलेल्या या दमदार कमबॅकमुळे त्यांचे चाहते भलतेच खुश झाले आहेत. त्यांनी कॅप्शन देखील लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, “जवळपास 40 मिनिटात पाच किलोमीटर एवढे अंतर पार केल्यानंतर खूपच चांगलं वाटत आहे. या खुल्या रस्त्यावर परत एकदा येऊन मनाला खूपच शांत मिळाली आहे. कोरोनाबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या होत्या आणि बघितल्या देखील होत्या. मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की, दर दहा दिवसांनी तुमच्या रक्ताची चाचणी करून घ्या.”
मिलिंद यांनी पुढे असे सांगितले की, “मला माहित आहे की, कोव्हिड- 19 हा एक गंभीर विषय आहे. गेल्या 25 वर्षांपासून मला कोणता आजार नव्हता. त्यामुळे हलकासा ताप आणि सर्दी देखील माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. परंतु आपल्याला जास्तीत जास्त जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.”
मिलिंद सोमण हे त्यांच्या आरोग्याची खूप काळजी घेतात. ते दररोज पळायला जातात. एवढेच काय तर ते सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. प्रत्येक दिवशी ते त्यांच्या चाहत्यांना फिटनेसबाबत काही ना काही टिप्स देत असतात. त्यामुळे त्यांनी लिहिले की, “आपल्या आरोग्याला आणि फिटनेसला समजून घेणं आणि त्याला सांभाळणं खूप गरजेचं आहे. फिटनेसचा अर्थ सिक्सपॅक होत नाही, तर आपल्या शरीरासोबत आपल्या मनालाही तेवढेच समाधान वाटले पाहिजे.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-