Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

पार्टनर कमी वयाचा असेल तर नात्यातला प्रमाणिकतेवर परिणाम होतो का? मिलिंद सोमण म्हणतोय…

सुपरमॉडेल, अभिनेता, निर्माता आणि फिटनेस प्रमोटर म्हणून मिलिंद सोमण ओळखला जातो. वयाच्या ५५ व्या वर्षी मिलिंदच्या फिटनेस पाहून भल्याभल्याना त्याचे अप्रूप वाटते. मिलिंद सोमणचे व्यक्तिमत्त्व अतिशय आकर्षक असून, तो स्वतःच्या फिटनेसची जबरदस्त काळजी घेतो. मिलिंदने हिंदी, मराठी आणि तामिळ या भाषांमधील चित्रपटात काम केले आहे.

मिलिंदने २०१८ मध्ये त्याच्यापेक्षा २६ वर्ष लहान अंकिता कोनवार सोबत लग्न केले. जेव्हापासून त्यांचे लग्न झाले तेव्हापासून मिलिंद त्याच्या चाहत्यांना कपल गोल्स देत असतो. मिलिंद आणि अंकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ते नेहमीच त्यांचे फिटनेस व्हिडिओ आणि फोटोस फॅन्ससोबत शेयर करत असता.

मिलिंदने वयाच्या ५२ व्या वर्षी २६ वर्षीय अंकितासोबत विवाह केला. या दोघांच्या वयात तब्बल २६ वर्षांचे अंतर आहे. अनेकदा या दोघांच्या वयातील अंतराची खूप चर्चा होत असते. सुरुवातीला अनेकांनी मिलिंदला या अंतरावरून ट्रोल देखील केले होते. मात्र, मिलिंद आणि अंकिता या चर्चांकडे आणि ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात.

अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत मिलिंदने त्यांच्या वयातील अंतरावर मनमोकळी चर्चा करत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

मिलिंदला त्यांच्या नात्याविषयी प्रश्न एक विचारला गेला. ‘कमी वयाचा लाईफ पार्टनर असल्यामुळे नात्यातील प्रमाणिकतेवर परिणाम होतो का?’, असा प्रश्न मिलिंदला विचारण्यात आला. त्यावर मिलिंदने सडेतोड उत्तर दिले.
तो म्हणाला, “प्रामाणिकपणाचा संबंध थेट तुमचा समंजसपणा आणि विचार यांच्यावर अवलंबून आहे. प्रामाणिकपणा आणि शारीरिक जवळीकता यांचा काहीही संबंध नाही. तुमच्यासाठी नेमके काय महत्वाचे आहे यावर सर्व अवलंबून असते. नात्यात सेक्स तितका महत्वपूर्ण नसून तुमच्यातील भावनिक नाते जास्त महत्वाचे आहे. ते भावनिक नाते कसे आहे यावर सगळ अवलंबून असते”.

हे देखील वाचा