Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड अर्रर्र, हे काय झालं! शाहिद कपूरच्या पत्नीच्या चेहऱ्यावर दिसले किडे, व्हिडिओ जोरदार व्हायरल

अर्रर्र, हे काय झालं! शाहिद कपूरच्या पत्नीच्या चेहऱ्यावर दिसले किडे, व्हिडिओ जोरदार व्हायरल

देशभरात रविवारी (१४ नोव्हेंबर) बालदिन साजरा केला जात आहे. प्रत्येकजण बालदिनाच्या वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत आहे. अनेकजण लहान मुलांचे फोटो शेअर करत बालदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. याचप्रमाणे बॉलिवूडचे अनेक कलाकारही आपल्या मुलांचे फोटो शेअर करत चाहत्यांना बालदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. नुकतेच आता बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मीरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर ३ मिलियनपेक्षाही अधिक फॉलोव्हर्स आहेत. मीरा अनेकदा पती शाहिद आणि तिचे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करत असते. मीराने शेअर केलेल्या या नवीन व्हिडिओमध्ये फिल्टरचा वापर केला आहे. व्हिडिओमध्ये फिल्टर वापरून मीराने तिच्या चेहऱ्यावर किडे रेंगाळल्यासारखे केले आहे. मात्र, तिचा मुलगा झैनला तिचा हा मजेदार व्हिडिओ आवडला नाही. तिने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझ्या मुलाने म्हटले आहे की, मी त्याला त्रास देत आहे आणि मला हे अजिबात विचित्र वाटले नाही.” ती म्हणाली, “मला वाटते की या प्रकरणात मी डॅड- विनोदाचा भाग होते.”

मीराच्या या व्हिडिओला आतापर्यंत २० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तिचे चाहते या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, “हा व्हिडिओ मुलांना दाखवू नका.” मीराच्या चाहत्यांना तिची ही फनी स्टाईल आवडली आहे आणि ते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

मीराने तिची मुलगी मीशाचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “आज बालदिन आहे, प्रत्येक दिवशी बालदिन आहे माझ्या बाळा.”

शाहिद चित्रपटांमध्ये व्यस्त आहे, तर मीरा स्वत:ला जाहिरातींमध्ये व्यस्त ठेवते. सोशल मीडियावर खूप सक्रिय असणारी मीरा राजपूत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मतही मांडते. मीरा शाहिदची पत्नी असण्यासोबतच ती आपल्या बिनधास्त अंदाजासाठी देखील ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लॅम्बोर्गिनीच्या बोनेटवर ठेऊन चाऊमीन खाताना दिसला कार्तिक आर्यन, अभिनेत्याच्या साधेपणावर भाळले चाहते

-मोठे केस, मोठी दाढी अन् कपाळी टिक्का; ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनचा डॅशिंग लूक रिलीझ

-‘पंगा क्वीन’ कंगनाने भारताच्या फाळणीवर प्रश्न केले उपस्थित, म्हणाली, ‘आपण स्वातंत्र्य सैनिकांचा…’

हे देखील वाचा