Monday, July 1, 2024

‘मिर्झापूर’मध्ये अत्यंत सोज्वळ दिसणारी ‘कालीन भैय्या’ची सून खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड, पाहून चाहतेही फिदा

‘मिर्झापूर’ वेबसीरिज पाहिली नसेल असा प्रेक्षक शोधणे जरा मुश्किलच आहे. या सीरिजने लोकांना वेबसीरिज पाहायचे वेड लावले. ‘मिर्झापूर २’ वेबसीरिज सुद्धा प्रचंड गाजली. या सीरिजमधील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. म्हणूनच आजही या सिरीजच्या पुढच्या पर्वाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. याच सीरिजमध्ये माधुरी भाभी म्हणून पंकज त्रिपाठीच्या सुनेची भूमिका साकारणारी ईशा तलवार प्रचंड लोकप्रिय झाली होती. आता याच माधुरी भाभीच्या व्हायरल फोटोंनी सर्वांना वेड लावले आहे.

‘मिर्झापूर २’मध्ये कालीन भैय्याच्या सुनेची भूमिका साकारणारी माधुरी भाभी म्हणजेच ईशा तलवार (Isha Talwar) तिच्या अफलातून अभिनयाने चांगलीच चर्चेत आली होती. ईशाच्या सहजसुंदर अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. सीरिजमध्ये अत्यंत सोज्वळ आणि साधी दिसणारी ईशा प्रत्यक्ष मात्र खूपच बोल्ड आहे. तिच्या घायाळ करणार्‍या सौंदर्याने, बोल्ड लूकने सगळ्यांना फिदा केले आहे. आता ईशाने पुन्हा एकदा नवीन फोटोशूट केले आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये ईशा कधी मोनोकिनी ड्रेसमध्ये, तर कधी बिकिनीमध्ये दिसत आहे. ईशाचे हे व्हायरल हॉट आणि बोल्ड फोटो पाहून चाहते मात्र क्लीन बोल्ड झाले आहेत. या व्हिडिओसोबत ईशाने “फोटो एक मूड अनेक,” असे भन्नाट कॅप्शन दिला आहे. सध्या या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

यावर काही जणांनी “माधुरी भाभी जिंदाबाद” म्हणत, तर काही जणांनी “तुम्ही खूप सेक्सी दिसत आहात,”असे म्हणत ईशाच्या फोटोचे कौतुक केले आहे. एकंदरीत या बोल्ड आणि मादक फोटोंमुळे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.

ईशा तलवार ‘मिर्झापूर २’ मध्ये झळकली होती. या सीरिजमधील तिच्या शांत, संयमी भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. याआधीही तिने अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. याव्यतिरिक्त तिने सलमान खान, सैफ अली खान अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत भूमिका साकारल्या आहेत.

हे देखील वाचा