‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्री ईशा तलवार आहे तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालकीण, सलमानसोबतही केले आहे काम


ईशा तलवार या अभिनेत्रीला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. ‘मिर्झापूर २’ वेब सीरिजमध्ये माधुरी यादवची भूमिका साकारणाऱ्या ईशाला अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट स्टार जोडीसाठी एशियानेट फिल्म अवॉर्ड आणि २०१३ मधील सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी वनिता फिल्म अवॉर्डचा समावेश आहे. केवळ अभिनयच नाही, तर आपल्या सौंदर्याने लोकांना वेड लावणारी ईशा बुधवारी (२२ डिसेंबर) तिचा ३४वा वाढदिवस साजरा करत आहे. ईशाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिने किती संपत्ती कमावली आहे.

ईशा (Isha Talwar) ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे जी हिंदी तसेच मल्याळम, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम करते. २२ डिसेंबर १९८७ रोजी मुंबईत जन्मलेल्या ईशाने मुंबईतील प्रसिद्ध सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने लोकांना वेड लावणारी ईशा प्रसिद्ध वेब सीरिज ‘मिर्झापूर’मध्ये माधुरी भाभीची भूमिका साकारून प्रसिद्धीच्या झोतात आली. ‘मिर्झापूर २’मध्ये प्रेक्षकांना ईशा खूप आवडली होती. ईशाने केवळ नावच नाही, तर पैसाही कमावला आहे. खऱ्या आयुष्यात ती करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे.

ईशाने लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. अभिनयासोबतच ईशा मॉडेलिंग देखील करते आणि ती उत्तम डान्सर देखील आहे. ईशाने आतापर्यंत ४० हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे. राजेशाही जीवन जगणाऱ्या ईशाने अल्पावधीतच भरपूर संपत्ती कमावली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, ईशा तलवारची एकूण संपत्ती १५ कोटी रुपये आहे. ईशाकडे स्वतःचे आलिशान घर आणि अनेक आलिशान गाड्या आहेत. ईशा ऑडी, बीएमडब्ल्यू सारख्या आलिशान गाड्यांची मालकीण आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, ईशा तलवार एका चित्रपट किंवा वेब सीरिजसाठी ७० ते ९० लाखांपर्यंत फी घेते. याशिवाय त्याने मॉडेलिंगमधूनही भरपूर कमाई केली आहे. ईशा बर्‍याच दिवसांपासून काम करत आहे, मात्र ‘मिर्झापूर-२’ या वेबसिरीजमध्ये तिने साकारलेल्या माधुरी भाभीच्या भूमिकेने तिला एक नवी ओळख दिली आहे. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. यानंतर ईशाला मागे वळून पाहावे लागले नाही.

ईशा तलवारने ‘ट्यूबलाइट’, ‘कालकांडी’, ‘आर्टिकल १५’ आणि ‘गिन्नी वेड्स सनी’ सारख्या अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये आपला अभिनय दाखवला आहे. ईशा तलवार हिंदी चित्रपटांसोबतच मल्याळम चित्रपट करत असते.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!