Wednesday, July 17, 2024

इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेली मिर्झापूरची ‘सलोनी त्यागी’ नक्की आहे तरी कोण?

मिर्झापूर 3 (Mirzapur 3) या वेबसिरीज सध्या चांगलीच चर्चत आहे. या आधी या सीरिजचे २ भाग प्रदर्शित झालेले आहे. तिसऱ्या भागाला देखील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद आणि प्रेम मिळत आहे. या सीरिजला सध्या समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. मिर्झापूर सीझन 3 मध्ये तुम्हाला जर कोणी सर्वात जास्त प्रभावित केले असेल, तर ती आहे अभिनेत्री नेहा सरगम ​​उर्फ ​​सलोनी त्यागी. या सिरीजमध्ये ती विजय वर्माच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली आहे.

सोशल मीडियावर नेहा सरगमची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येकजण तिच्याबद्दल जाणून घेण्यात उत्सुक आहेत. कारण या सिरीजमध्ये तिने विजयसोबतचा एक बोल्ड सीन दिला आहे. जो सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by neha sargam (@nehasargam)

मिर्झापूर 3 मध्ये, नेहा सरगमने त्यागी कुटुंबातील सून सलोनी त्यागीच्या भूमिकेत तिच्या उत्कृष्ट अभिनयाची छाप सोडली आहे. नेहा मूळची बिहारमधील पाटणा येथील असून तिचे खरे नाव नेहा दुबे आहे. सध्या ती तिच्या बोल्ड सीन्समुळे चर्चेत असते.

नेहा खऱ्या आयुष्यात किती हॉट आहे याचा अंदाज तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर असलेल्या फोटो आणि व्हिडिओंवरून सहज लावता येतो. नेहा तिच्या किलर लूकने कोणालाही वेड लावू शकते. अभिनेत्री असण्यासोबतच नेहाकडे गायनाचीही प्रतिभा आहे आणि तिने अनेक संगीत कार्यक्रमही केले आहेत. सध्या त्याचे फोटो इंटरनेटवर वणव्यासारखे व्हायरल होत आहेत.

नेहा सरगमने तिच्या अभिनय कारकिर्दीला छोट्या पडद्यापासून सुरुवात केली होती. इंडियन आयडॉल 4 मध्येही ती स्पर्धक म्हणून दिसली आहे. याशिवाय नेहाने चांद छुपा बदल में, रामायण, डोली अरमानों की, सपना बाबुल का विदाई आणि यशोमती मैया के नंदलाला यांसारख्या मालिकांमध्ये तिच्या अभिनय कौशल्याचा प्रसार केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सलमान खानच्या घरावर गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई, नऊ आरोपींवर आरोपपत्र दाखल
विशाल पांडेची बहीण अरमानवर चिडली; म्हणाली, ‘याची शोमध्ये येण्याची त्याची लायकी नाही…’

हे देखील वाचा