Sunday, June 8, 2025
Home अन्य खुशखबर! मिर्झापुर वेब सिरिजचा तीसऱ्या भागाला मिळाली सुटका, न्यायालयाने तक्रारीवर केले..

खुशखबर! मिर्झापुर वेब सिरिजचा तीसऱ्या भागाला मिळाली सुटका, न्यायालयाने तक्रारीवर केले..

ओटीटीवरील सर्वात जास्त क्रेज असणारी वेब सिरीज म्हणजे ‘मिर्झापूर‘ या सिरिजने लोकांना वेढ लावले आहे. क्राइम दुनियेतील सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणारी मिर्झापूर सिरिजला ओळखले जाते. आता या सिरिजचा  लवकरच प्रेक्षकांच्य भेटीला येणार आहे. काहि दिवसांपूर्वी या सिरिजवर कारवाई केली होती, त्यामुळे याचा तिसरा भाग 3 प्रदर्शित करण्याला बंदी केली होती. मात्र, गुरुवार (दि. 13 ऑक्टोंबर) दिवशी कोर्टाने मिर्झापूर वेबसिरिजच्या तिसऱ्या भागाला प्रदर्शित कण्याची बंदी काढली आहे. आता लवकरच मिर्झापुरचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीली येणार आहे.

सुप्रीम कोर्टाचे न्यायधीश उमेश ललित (Umesh Lalit) आणि बेला त्रिवेदी (Bela Trivedi) यांनी मिर्झापूर बेव सिरिजमधील सुजित कुमार सिंग (Sujit Kumar Sigh) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावनी करण्यात आली. या याचिकेत वेब सिरिज, चित्रपट किंवा इतर सामग्री थेट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यासाठी प्री-स्क्रीनिंग समिती स्थापन करण्याची विनंती करण्यात आली होती. कोर्टाने सांगितले की,”वेब सिरिजसाठी प्री स्क्रीनिंग कमिटी कशी असू शकते? जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही की, OTT देखिल या कायद्याचा एक भाग आहे…तुम्हाला असे म्हणायचे आहे की, सध्याचा कायदा OTT ला देखिल लागू आहे. यांनतर अनेक प्रश्न निर्माण होतील, कारण याचे प्रसारण इतर देशांमधूनही केले जाते.”

कोर्टाने मिर्झापूरची बाजू घेऊन या वेब सिगरजला बंद होण्यापासून वाचवले आहे. हा निर्णय देण्यासोबतच न्यायधिशाने याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्याचा आदेशही दिला. न्याधीशानी सांगितले की, ओटीटीवर येणारा मजकूर फक्त भारताचाच नाही, तर इतार देशातूनही प्रसारित होत असतो, जो अनेक प्रेक्षकांनी पाहिला आहे. त्यानंतर सगळ्याच गोष्टी खूप वेगळ्या असतात. तुम्ही दाखल केलेली याचिका सर्वसमावेशक असायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला याचिका दाखल करण्यासाठी चांगला मुद्दा पाहिजे असतो. त्यासोबत न्यायालायाने मिर्झापूरच्या तिसऱ्या सिजनला स्थगित करण्यास नकार दिला आहे. ही बातमी ऐकूण प्रेक्षक खूपच खु्श झाले आहेत. आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे की, मिर्झापूरचा तिसरा भाग कधी आपल्या भेटीली येणार.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉयफ्रेंडसाठी राखीनं ठेवला करवा चौथ, त्याच्यासाेबत विमानतळावर झाली स्पॉट, व्हिडिओनं वेधलं लक्ष
काय सांगता! साराचं अन् शुबमनचं अफेअर? फ्लाईटमधला व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा