Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड ‘मिर्झापूर’मधील मुन्ना भेैय्या दिसणार अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये? झाला मोठा खुलासा

‘मिर्झापूर’मधील मुन्ना भेैय्या दिसणार अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये? झाला मोठा खुलासा

प्रेक्षक बर्‍याच दिवसांपासून मिर्झापूरच्या तिसर्‍या भागाच आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. या वेब सीरिजचे संबंधीत कलाकार नेहमीच चर्चेत येत असतात. या वेबसीरिज मुन्ना भेैय्या यांची भूमिका साकारणार दिव्यांदू शर्मा आता नुकताच आलेल्या अयान मुखर्जी (ayan mukharjee) च्या ब्रम्हास्त्र चित्रपटाबद्दल बोलला आहे . ‘ब्रह्मास्त्र’ च्या विकिपीडियावर त्याचे नाव दिसले आहे. ज्याचा असा अंदाज लावला जात आहे की तोही या चित्रपटाचा एक भाग होणार आहे.

एका मुलाखती दम्यान दिव्यांदू विचारले गेले की, तो अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचा भाग होणार आहे का? यावर दिव्यांदूने हसून उत्तर दिले की, “ही खोटी बातमी आहे.” त्याच्या विकीपीडीयाच्या पानावर माझे नाव कसे आले मला कल्पना नाही. कदाचित हे सिक्वेलसाठी असेल, परंतु ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागात तर नाही. या चित्रपटासाठी माझी कधीच बैठक झाली नव्हती, किंवा आम्ही याबद्दल कधीही बोललो नाही. पुढे, दिव्यांदू म्हणाला की, “मी खरोखर आशा करतो की ते चित्रपटाच्या श्रेयात माझे नाव जोडणार नाहीत. लोक म्हणतील की, त्यांनी चित्रपटामधून माझी भूमिका कट केली.”

बॉलिवूडमध्ये दिव्यांदू शर्माने २०११ मध्ये ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटापासून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटांबरोबरच ‘मिर्झापुर’, ‘बिच्छू का खेल’ या वेब सीरिजमध्ये झळकलेल्या अभिनेता दिव्यांदू शर्मा यानं आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अमेजन प्राइम वीडियोची ‘मिर्जापुर’ वेब सीरिजपासून प्रचंड लोकप्रियता मिळाली.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिका साकरणार आहे. दोन्ही कलाकार पहिल्याचं प्रेक्षकांना एकत्र दिसणार आहे. याच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन,(amitabh bachchan) मौनी रॉय (mouni roy) और नागार्जुन सुद्धा या  चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबरला हिंदी, तमिल, तेलुगू, मलयालम और कन्नड़ या सर्व भाषेत प्रकाशित होणार आहे

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

टेलिव्हिजनवरील सोज्वळ अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल, बोल्डनेसने केले चाहत्यांना घायाळ

‘माझ्या मुलाला बर्गर विकताना पाहायचयं’ करोडो रुपये कमावणाऱ्या अभिनेत्रीचे अजब स्वप्न

चित्रपटात प्रेमकथा गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रींचे दुर्देव, खऱ्या आयुष्यात मात्र लवस्टोरी राहिली अपूर्ण

 

हे देखील वाचा