Friday, April 19, 2024

अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीवर आलीये वाईट वेळ, मोमोज विकून भरतीये पोट

देशात जेव्हा कोरोना व्हायरस पसरत होता, तेव्हा काही क्षणांसाठी ते कठीण मानले जात होते. त्यावेळेस कोणालाही माहित नव्हते की, या विषाणूमुळे लोक आपले जीवन, करिअर आणि नोकरी गमावतील. मार्च २०२० पासून देशात कोरोना झपाट्याने वाढत होता, त्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. एकेकाळी बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या बॉलिवूडच्या महिला कॅमेरापर्सन सुचिस्मिता रोत्रेयांवरही या महामारीचा परिणाम झाला.

अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, वरुण धवन आणि आलिया भट्ट यांसारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्ससोबत काम केलेली सुचिस्मिता (suchismita routray) आज ओडिशामध्ये मोमोज विकत आहे. मोठ्या चित्रपटांमध्ये कॅमेऱ्याच्या मागे काम करणाऱ्या सुचिस्मिताला आता मोमोज विकावे लागतात ज्यातून ती दिवसाला ३००-४०० रुपये कमवते.

या महामारीचा लाखो लोकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे आणि बॉलिवूडही त्याला अपवाद नाही. मात्र, जिथे बड्या स्टार्सचे आयुष्य पुन्हा सुरू झाले, तिथे सुचिस्मितासारख्या कलाकारांसाठी परिस्थिती पूर्णपणे बदलली. त्यांच्या मते, लॉकडाऊनपूर्वी सर्व काही ठीक होते. कामही उपलब्ध होत होते आणि नव्या संधीही दिसू लागल्या होत्या. कोरोनाने तिच्या आयुष्यात असा स्पीड ब्रेकर लावला की तिची नोकरी गेली. आता ती मोमोज विकून पोट भरत आहे.

एका माध्यमाशी बोलताना सुचिस्मिताने सांगितले की, तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने ओडिया साइन इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर २०१५मध्ये मुंबईत आली. हळूहळू कामाला सुरुवात झाली. त्यानंतर सहा वर्षे तिने असिस्टंट कॅमेरा पर्सन म्हणून काम केले. मग कोरोनाच सावट आलं आणि सर्व काही बदलले.

आता सुचिस्मिता तिच्या आईसोबत कटकमध्ये राहते. तिच्या घरात ती एकमेव कमावती आहे आणि तिच्या वडिलांचेही निधन झाले आहे. त्यांना उद्योगात काम मिळत नाही. कोरोना प्रकरणाबद्दल बोलायचे झाले तर भारतातील ६ राज्यांमध्ये त्याचा सर्वाधिक प्रभाव दिसून आले. त्याचवेळी महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या ब्रेकअपवर वडील जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया चर्चेत

चाहत्यांना मोठा धक्का, ‘या’ कारणामुळे बंद होणार दाक्षिणात्य चित्रपटांची शूटिंग

चाळीस वर्षापूर्वीची ‘ती’ एक चूक पडली महागात,आजही यातना भोगत आहेत महानायक अमिताभ बच्चन

हे देखील वाचा