Monday, July 1, 2024

‘मिर्झापूर’च्या स्वीटी गुप्ताने बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत सोशल मीडियावर लावली आग, चाहतेही झाले घायाळ

सन २०१८ साली प्रदर्शित झालेली मिर्झापूर वेब सीरिज जबरदस्त हिट झाली. या सीरिज ची कथा, अभिनय, कलाकार सर्वच लोकप्रिय झाले. मिर्झापूरमध्ये काम केलेल्या सर्वच कलाकारांना या सीरिजने भरभरून प्रेक्षकांचे प्रेम आणि लोकप्रियता दिली. सर्वच कलाकारासाठी ही सीरिज त्यांच्या करियरचा एक टर्निंग पॉईंट ठरली. अनेक दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत देखील एका अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

ही अभिनेत्री आहे श्रिया पिळगावकर. श्रियाने ‘मिर्झापूर’मध्ये स्वीटी गुप्ता ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांसोबतच, समीक्षकांनीही भरभरून दाद दिली. श्रियाने या सीरिजआधी देखील बरेच काम केले होते. तिने शाहरुख खानच्या ‘फॅन’ सिनेमातही भूमिका साकारली होती. मात्र, मिर्झापूरने तिला प्रचंड लोकप्रियता दिली.

तिच्या प्रभावी अभिनयाने तिने खूप प्रसिद्धी मिळवली. आज जर कोणी स्वीटी गुप्ता नाव घेतले, तर मिर्झापूर आणि मिर्झापूर म्हटले की, स्वीटी गुप्ताच आठवते.

अचानक श्रिया चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, तिचे नवीन बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट. श्रियाने नुकतेच एक फोटोशूट केले असून यात ती खूपच सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर तिने फोटो पोस्ट केल्यानंतर काही तासातच ते फोटो व्हायरल झाले आहेत. प्रेक्षकांनी तिच्या या फोटोंना लाईक्स आणि कमेंट्स करत पसंतीची पोचपावती दिली आहे.

श्रियाच्या या भूमिकेने लोकांना इतके प्रभावित केले आहे की, मिर्झापूरच्या प्रदर्शनानंतर एकदा तिचे बाबा म्हणजेच सचिन पिळगावकर बाहेर पडले, तेव्हा त्यांना ‘स्वीटी गुप्ता के फादर’ असे म्हणून लोकांनी ओळखले. हा किस्सा खुद्द श्रियानेच सांगितलं आहे.

श्रियाने अभिनयाव्यतिरिक्त स्विमिंग आणि कथक डान्समध्ये सुद्धा प्राविण्य मिळवले आहे.

श्रियाला तिचे शिक्षण चालू असतानाच तिच्या एका मित्राने एका शॉर्ट प्लेमध्ये अभिनयासाठी निवडले होते. तेव्हाच तिला जाणवले की ती अभिनय करू शकते.

श्रिया लवकरच राणा दग्गुबतीच्या ‘हाथी मेरे साथी’ सिनेमात दिसणार आहे.

हेही वाचा-

कालीन भैय्यांचं ‘मिर्झापूर’ सापडलं संकटात, निर्मात्यांविरुद्ध ‘हा’ व्यक्ती गेला कोर्टात

ओटोटीच्या दुनियेत ‘या’ कलाकारांचा राहिला दबदबा; अभिनयाच्या जोरावर जिंकली कोट्यवधी हृदये आणि पटकावले पुरस्कार

 

कोण आहे ‘कालीन भैय्या’च्या पत्नीची भूमिका साकारणारी रसिका दुग्गल? ‘या’ चित्रपटांमध्येही केलंय काम

हे देखील वाचा