कालीन भैय्यांचं ‘मिर्झापूर’ सापडलं संकटात, निर्मात्यांविरुद्ध ‘हा’ व्यक्ती गेला कोर्टात


सुरुवातीला चित्रपट आणि मालिकांवरून अनेक वाद व्हायचे. जात, धर्म, देव, संवाद, शिव्या, कपडे अशा अनेक मुद्यांवरून अनेक विवाद आपण पाहिले आहेत. तसे पाहिले तर या इंडस्ट्रीला यासर्व गोष्टींची जणू सवयच झाली आहे. असे अनेक वाद घडत असताना आपल्या आयुष्यात प्रवेश केला तो वेबसिरीज आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मने.

सुरुवातीला वेबसिरीज या माध्यमासाठी कोणतेच नियम अथवा सेन्सॉर बोर्ड नव्हते. त्यामुळे दिग्दर्शक निर्माते अगदी दिलखुलासपणे त्यांना जे दाखवायचे आहे ते या माध्यमातून कोणत्याही अडथळ्याशिवाय दाखवू लागले. आधी लोकांनी सुद्धा या सर्व गोष्टींना चांगला प्रतिसाद दिला. मात्र जस जसे या माध्यमाबद्दल लोकांना समजू लागले, तसतसे या माध्यमाची क्रेझ प्रचंड वाढत गेली. मग हळूहळू चित्रपट, मालिकांवरून होणारे वाद आता वेबसिरीजवरून देखील व्हायला लागले, आणि वेबसिरीजसाठी देखील सेन्सर बोर्ड असावे अशी मागणी जोर धरू लागली.

नुकतीच अमेझॉन प्राईमची सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेली ‘तांडव’ ही वेबसिरीज प्रदर्शित करण्यात आली. पण प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी ही सिरीज वादात अडकली. हा वाद इतका वाढला की, सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग, लोकांच्या कमेंट्स याहीपुढे जाऊन या सिरीजवर आणि यातील कलाकारांवर तक्रार दाखल करण्यात आल्या. आता हा वाद ताजा असतानाच अमेझॉनच्याच ‘मिर्झापूर’ या वेबसिरीज विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिर्झापूर सिरीजच्या निर्मात्यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्याच्या याचिकेसोबत होईल. सीजेआई एसए बोबड़े, जस्टिस एएस बोपन्ना आणि वी रामा सुब्रमण्यम या टीमने ही नोटीस जरी केली आहे.

या वेबसिरीजवर मिर्झापूर गावाची छबी खराब करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. सोबतच असेही म्हटले आहे की, या गावाच्या तरुणाला मिर्झापूरचा असल्यामुळे दुसऱ्या राज्यात नोकरी मिळत नाही. प्राप्त माहितीनुसार उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यामधील चिलबिलिया भुइली येथे राहणारे अरविंद चतुर्वेदी यांनी ही केस फाईल केली आहे.

लोकांचा असाही आरोप आहे की, मिर्झापूरला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. त्यामुळेच या गावाच्या धार्मिक, क्षेत्रीय आणि सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. मिर्झापूर वेबसिरीज संबंधित रितेश साधवानी, फरहान अख्तर, भौमिक गोडलिया आणि अमेझॉन प्राईम वर गुन्हा दाखल केला गेला आहे.

जेव्हा या सिरीजचा ऑक्टोबरमध्ये दुसरा सिझन आला होता तेव्हा देखील खूप वाद झाला. या सिरिजला बॉयकॉट करण्याची खूप मागणी सोशल मीडियावर झाली. लोकांना असेही वाटते की या सिरीजमध्ये नात्यांचे असे संबंध दाखवले आहेत, ज्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. मिरपूरचा पहिला सिझन २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता.

मिर्झापूर २ मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी सोबत अनेक कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत. या सिरीजमध्ये पंकज त्रिपाठी यांच्या भूमिकेचे नाव कालीन भैया असून, त्यांच्या मुलाची मुन्ना त्रिपाठीची भूमिका दिव्येंदु शर्माने साकारली आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.