Monday, June 24, 2024

मिर्झापूर फेम अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन

प्रसिद्ध अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ५६ वर्षांचे होते. त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते, मात्र दुर्दैवाने त्याआधीच त्यांचे निधन झाले.

शाहनवाज प्रधान हे मनोरंजनविश्वात मोठ्या प्रमाणावर सक्रिय होते. त्यांनी तुफान गाजलेल्या मिर्झापूर या वेबसिरीजमध्ये गुड्डू भैयाच्या सासऱ्यांची भूमिका साकारली होती. त्यांनी या सिरीजमध्ये श्वेता (गोलू) आणि श्रिया पिळगावकर (स्वीटी) यांच्या वडिलांची परशुराम गुप्ता यांची भूमिका साकारली होती. या सिरीजमध्ये त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेते राजेश तेलंग यांनी शाहनवाज प्रधान यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. त्यानी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, “शाहनवाजजी शेवटचा नमस्कार!!! काय सुंदर निर्मळ व्यक्ती आणि प्रतिभावान अभिनेते होता तुम्ही. मिर्झापूरच्या वेळेस किती सुंदर वेळ तुमच्यासोबत मला घालवता आला. खरंच विश्वास बसत नाही.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajesh Tailang (@rajeshtailang)

यशपाल शर्मा यांनी देखील त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करताना लिहिले, “आज मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. सर्व काही सुरळीत चालू होते. पुरस्कार मिळाल्यानंतर शाहनवाज प्रधान यांना हृदयविकाराचा झटका आला. पूर्ण कार्यक्रमच थांबला. सर्व लोकं त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात घेऊन गेले मात्र त्यांना वाचवता आले नाही. हेच आमच्या आयुष्याचे कटू सत्य आहे. आमच्या डोळ्या देखत एक आयुष्य संपुष्टात आले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Yashpal Sharma (@iyashpalsharma)

तत्पूर्वी शाहनवाज प्रधान यांचा जन्म उडिसाच्या एका मध्यमवर्गीय परिवारात झाला. वयाच्या सातव्या वर्षी ते कुटुंबासोबत रायपूरला आले आणि सातवीमध्ये असताना त्यांनी पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केले. शाहनवाज प्रधान हे ८० च्या दशकात देखील लोकप्रिय होते. त्यावेळी त्यांनी श्रीकृष्णा या मालिकेत नंद ही भूमिका साकारली होती. त्यानंतर आलेल्या आलिफ लैला मध्ये देखील ते दिसले होते. प्राप्त माहितीनुसार त्यांच्यावर १८ फेब्रुवारी शनिवारी अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ऍक्शनचा तडका असलेला ‘फेमस’ चित्रपट येतोय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

‘बिग बाॅस 16’चा विजेता एमसी स्टॅन इंस्टग्रामवरुन करताे भक्कड कमाई, आकडे पाहून तुम्हीही व्हाल थक्क

हे देखील वाचा