Sunday, February 8, 2026
Home बॉलीवूड मिर्जापुर द मूव्ही: कालीन भैय्यांच्या सत्तेला आव्हान देणारे दोन OG गँगस्टर्स, तर 5 नव्या चेहऱ्यांनी रंगणार कथा

मिर्जापुर द मूव्ही: कालीन भैय्यांच्या सत्तेला आव्हान देणारे दोन OG गँगस्टर्स, तर 5 नव्या चेहऱ्यांनी रंगणार कथा

ओटीटीच्या दुनियेत काही मोजक्याच वेब सीरिज अशा असतात ज्या रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये अक्षरशः वादळ निर्माण करतात, आणि ‘मिर्जापुर’ ही त्यापैकीच एक आहे. बेधडक संवाद, क्रूर हिंसा, सत्तेची निर्दय राजकारणं आणि लक्षात राहणाऱ्या पात्रांच्या जोरावर या सीरिजने अल्पावधीतच स्वतःला एक कल्ट क्लासिक म्हणून सिद्ध केलं. प्रत्येक नव्या सीझनसोबत ‘मिर्जापुर’ची लोकप्रियता अधिकच वाढत गेली आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर या शोने विक्रमी व्ह्यूअरशिप नोंदवली. मिर्जापुरची गादी, तिथल्या शत्रुत्वाच्या कथा आणि रक्तरंजित संघर्ष आजही प्रेक्षकांना तितक्याच थरारक वाटतात.

या प्रचंड क्रेझला पाहता आता निर्मात्यांनी ही लोकप्रिय फ्रँचायझी थेट मोठ्या पडद्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मिर्जापुर: द मूव्ही’ लवकरच सिनेमागृहांत त्याच धारदार, निर्भीड आणि भौकाली अंदाजात प्रदर्शित होणार आहे, ज्यासाठी ही सीरिज ओळखली जाते. या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

कालीन भैय्याची टोळी यावेळी नव्या कथेसह प्रेक्षकांसमोर येणार आहे. 4 सप्टेंबर रोजी ‘मिर्जापुर: द मूव्ही’ सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. या वेळी चित्रपटात अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार असून, यामुळे कथेला आणखी धार मिळणार आहे. पंकज त्रिपाठी, (Pankaj Tripathi)अली फजल, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी आणि रसिका दुग्गल यांच्यासोबत काही दिग्गज कलाकारांची एन्ट्री होणार आहे.

रवि किशन
भोजपुरी सुपरस्टार आणि खासदार रवि किशन ‘मिर्जापुर: द मूव्ही’मध्ये दमदार भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या भूमिकेबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी त्यांचा अंदाज पुन्हा एकदा प्रभावी असणार, अशी अपेक्षा आहे.

सुशांत सिंह
बॉलिवूडमधील ओजी गँगस्टर अभिनेता म्हणून ओळखले जाणारे सुशांत सिंह यांनी ‘सत्या’, ‘शूल’, ‘जंगल’, ‘सेहर’ आणि ‘रक्तचरित्र’सारख्या चित्रपटांत लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. आता ‘मिर्जापुर’च्या दुनियेत ते काय रंगत आणणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जितेंद्र कुमार
ओटीटीवरील लोकप्रिय अभिनेता जितेंद्र कुमार उर्फ ‘जीतू भैय्या’ या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत झळकणार आहेत. साध्या-सुध्या भूमिकांपासून दूर जाऊन ते इथे कोणत्या अवतारात दिसतील, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सोनल चौहान
‘जन्नत गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी सोनल चौहान या चित्रपटात ग्लॅमरचा तडका लावणार आहे. तिची भूमिका कथेला वेगळं वळण देईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोहित मलिक
टीव्ही विश्वात दबंग आणि निगेटिव्ह भूमिकांसाठी ओळखले जाणारे मोहित मलिकही या चित्रपटाचा भाग आहेत. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर त्यांचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

एकूणच, ‘मिर्जापुर: द मूव्ही’ मोठ्या स्केलवर, नव्या पात्रांसह आणि अधिक तीव्र कथानकासह प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव घेऊन येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

1 किलोही नव्हतं वजन, शरीर जांभळट पडलं होतं; जन्मताच प्रियंका चोप्रांच्या लेकीची कठीण लढाई

हे देखील वाचा