मिस युनिव्हर्स हरनाझ संधूचे वजन ३ महिन्यांत अचानक का वाढले? ‘हा’ आजार आहे कारण

गेल्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या हरनाझ कौर संधूने (Harnaaz Sandhu) जगभरात देशाचे नाव रोशन केले होते. २१ वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा खिताब परत आणणारी हरनाझ संधू या विजयानंतर जगभरात खूप चर्चेत होती. हे स्थान मिळाल्यापासून ती सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसत आहे. हरनाझ सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्याच वेळी चाहत्यांना तिचे फोटो आणि व्हिडिओ खूप आवडतात.

याच क्रमात नुकतेच हरनाझ संधूचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर यापूर्वी आलेली हे फोटो पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. खर तर, या फोटोंमध्ये हरनाझचा लूक पूर्णपणे वेगळा दिसत आहे. मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या हरनाझचा हा नवा लूक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Harnaaz Kaur Sandhu (@harnaazsandhu_03)

खर तर, या फोटोंमध्ये हरनाज लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवर चालताना दिसली होती. यादरम्यान ती फॅशन डिझायनर्स शिवान आणि नरेश यांची शोस्टॉपर होती. फॅशन वीकमध्ये हरनाझ लाल रंगाच्या गाऊनमध्ये दिसली होती. पण तिच्या इव्हेंटचे फोटो आणि व्हिडिओ समोर येताच तिला बॉडी शेमिंगची शिकार व्हावे लागले. या फोटो आणि व्हिडिओमध्ये हरनाझचे वजन पूर्वीच्या तुलनेत वाढलेले दिसत होते.

View this post on Instagram

A post shared by Miss Universe (@missuniverse)

लॅक्मे फॅशन वीक २०२२ पासून समोर आलेल्या हरनाझच्या ट्रान्सफॉर्मेशनचे व्हिडिओ आणि फोटोंवरील ट्रोलिंगवर हरनाझने नाराजी व्यक्त केली आहे. बॉडी शेमिंगची शिकार झाल्यानंतर, हरनाझने तिच्या एका लेटेस्ट मुलाखतीत म्हटले की, “मला त्याची पर्वा नाही. प्रत्येकाला आपलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.” चंदीगडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ट्रोल्सला चोख प्रत्युत्तर देताना हरनाझ पुढे म्हणाली की, “मी माझ्या शरीराचा आदर करते. मला सेलिआक रोग आहे. मला बॉडी शेमिंग आवडत नाही. लोकांना माहित नाही की, मला ग्लूटेनची ऍलर्जी आहे. मला स्टिग्मा ब्रेक करायला आवडते.”

ज्या लोकांना ग्लूटेनची ऍलर्जी आहे आणि विशेषत: सेलिआक रोग असलेल्यांना अन्न, जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषण्यास त्रास होतो. या समस्येचा सामना करण्यासाठी, शरीरात चरबी जमा होऊ लागते. ग्लूटेन ऍलर्जीने ग्रस्त असलेल्या लोकांना त्यांचे वजन राखणे फार कठीण जाते.

हरनाझच्या या फोटो आणि व्हिडिओंवर कमेंट करत असतानाच सोशल मीडिया युतजर्सनी तिला तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल केले. या फोटोंवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “कसली लठ्ठ झाली आहे.” तर दुसऱ्याने कमेंटमध्ये लिहिले की, “फॅट मिस युनिव्हर्स.” यावर एका युजरने कमेंट करताना म्हटले की, “हरनाझ कौर संधूचा ड्रेस एकदम खराब आहे.” त्याचवेळी, एका युजरने तिला एक प्लस साइज मॉडेल देखील म्हटले.

मिस युनिव्हर्स हरनाझला बॉडी शेमिंगचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. डिसेंबर २०२१ मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर ती बॉडी शेमिंगवर उघडपणे बोलली. तिने सांगितले होते की, पूर्वी लोक लुकडी असल्यामुळे तिची चेष्टा करायचे, पण तिच्या आईने तिला खूप साथ दिली. हेच कारण आहे की, अलीकडे बॉडी शेमिंगचा बळी झाल्यानंतरही तिने स्वतःला सकारात्मक ठेवले.

Latest Post