Saturday, May 23, 2026
Home अन्य धक्कादायक! मिस युनिव्हर्सचा घोडेस्वारी करताना झाला अपघात, वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

धक्कादायक! मिस युनिव्हर्सचा घोडेस्वारी करताना झाला अपघात, वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मिस युनिव्हर्स सीएना वीर हिने वयाच्या अवघ्या 23वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. सीएना ऑस्ट्रेलियामध्ये घोडेस्वारी करताना तिचा अपघात झाला, ज्यानंतर तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिची मृत्यू झाला.

माध्यमातील वृत्तानुसार, दि. 2 एप्रिलला माॅडेल सिडनीच्या विंडसर पाेलाे ग्राऊंडवर घाेडेस्वारी करत हाेती. मात्र, यादम्यान सीएना घाेड्यावरून पडून जखमी झाली, ज्यानंतर तिला वेस्टमीड रुग्नालयात नेण्यात आले. रुग्नालयात डाॅक्टरानी सीएनाल लाईफ सपाेर्ट सिस्टिमवर ठेवले.अशात गेल्या काही आठवड्यांपासून ती लाईफ सपाेर्ट सिस्टीमवर असताना आज म्हणजेच शनिवारी (6 मे)ला तिने अखेरचा श्वास घेतला.

सिएना मिस युनिव्हर्स 2022 या स्पर्धेत शेवटच्या टप्प्यात पोहोचली होती. मॉडेलिंग क्षेत्रात तिने उत्तम कामगिरीही केली.  सिएना कायमच आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडयची. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या सीएनची खूप माेठमाेठी स्वप्न होती. या स्वप्नाना पुर्ण करण्यासाठी तिने प्रवासाला सुरुवातदेखील केली होती.

सिएना हिने सिडनीच्या विद्यापीठातून इंग्रजी साहित्य आणि मनोविज्ञान या विषयांत पदवीचं शिक्षण घेतलं. अशात पुढील शिक्षणासाठी माॅडेल युकेला जाण्याचा विचार करत हाेती. अभ्यासाव्यतिरिक्त सिएनाला घोडेस्वारी करणं हे खूप आवडत होते. घोडेस्वारी करणे हे तिचे पॅशन होतं. यासाेबतच सिएना सोशल मीडियावर सक्रिय असून कायमच चाहत्यांच्या संपर्कात असायची. अशात माॅडेलच्या मृत्यूनंतर तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.(miss universe finalist sienna weir dies after tragic horse riding accident )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चिंतेमुळे 125 किलो वाढलं वजन अन् श्वास घेण्यास हाेत हाेता त्रास; पारस छाबराचा माेठा खुलासा, म्हणाला…

प्रतीक्षा संपली! धमाल कॉमेडी चित्रपट सासूबाई जोरात ‘या’ तारखेला हाेणार सिनेमागृहात प्रदर्शित

हे देखील वाचा