सध्या 2022 हे वर्ष नवीन वर्षाला सुरुवात झाली त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी प्रत्येकच जिवतोड मेहनत घेत आहे. चित्रपट गृहामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये नवीन चित्रपट प्रदर्शित होत असतात. त्यामुळे आपण बाहेर जाणं टाळत असतो मात्र, 2023 मध्ये तुम्हाला घरी बसल्या नवीन चित्रपट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच जानेवारी माहिन्यापासूनच OTT प्लॅटफॉर्मवर नवनवीन चित्रपट आणि वेबसिरिज प्रदर्शित होणार आहेत. चाला तर जाणून घेऊया की, यादीमध्ये कोणते चित्रपट आणि वेबसिरिज भेटीला येणार आहे.
विक्रम वेधा
रितिक रोशन (Hritik Rotion) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची ब्लॉकबस्टर जोडीने पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. विक्रम वेधा हा बिग बजेट चित्रपट (दि. 9 जानेवारी) रोजी Voot Select ओटीटी चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.
मिशन मजनू
‘शेरशाह‘ स्टारर प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ( Sidharth Malhotra) याचा नवीन चित्रपट मिशन मजनू (दि, 20 जानेवारी) रोजी थेट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपाटामध्ये सिद्धार्थसोबत नॅशनल क्रश म्हणजेच रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) देखिल पाहायला मिळणार आहे.
ताजा खबर
‘ताजा खबर’ या प्रसिद्ध वेबसिरिजमधील मुख्य अभिनेता युट्युबर भुवन बाम (Bhuvan Bam) याच्या वेबसिरिजची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. आता चाहत्यांची उत्सुकता संपवण्यासाठी नवीन वर्षाच्या पिहल्या आठवड्यातट या वेबसिरिजला ओटीटीवर प्रदर्शित करणार आहे. ‘ताजा खबर’ या बेवरिजिच्या ट्रेलरनेच प्रेक्षकांचे मनं जिंकली असून भुवन वसंत गावडेच्या भूमिकेत दिसणार आहे.
द पेले ब्लू आय
क्राइम आणि थ्रिलरने भरेलेली ‘द पेले ब्लू आय’ (The Pale Blue Eye) ही हॉलिवूड बेवसिरिज जानेवारीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लीक्सवर प्रदर्शित होणार आहे.
ट्रायल बाय फायर
अनेक दिवसांपासून वाट पाहात असणारी प्रसिद्ध वेबसिरिज ‘ट्रायल बाय फायर’ (Trial By Fire) ही चाहत्यांच्या पसंतीस उतरलेली वेबसिरिज आहे. अनेक दिवसापासून चाहते या वेबसिरिजची वाट पाहात आहेत. ही वेबसिरिज सत्य घटनेवर आधारित आहे. ही वेबसिरिज (दि. 13 जानेवारी) रोजी प्रदर्शित होणार आहे.(mission majnu to vikram vedha and more films web series released in new year 2023 january watch here)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एक्स गर्लफ्रेंड आलियाची ‘ही’ गोष्ट आजही मिस करतो सिद्धार्थ; ऐकून रणबीरचाही चढेल पारा
हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ