Friday, May 24, 2024

बॉलिवूडच्या अपयशावर सैफ अली खानने तोडले मौन, सांगितलं ‘हे’ मोठं कारण

बॉलूवडचा नवाब प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याने नुकतंच बॉलिवूडमध्ये सतत चित्रपट अपयशी ठरत आहेत. त्यामुळे अभिनेत्याने मोठे वक्तव्य केले आहे. कही दिवसांपूर्वी सैफचा ‘विक्रम वेधा‘ हा बिग बजेट चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटला. त्यापूर्वी बॉलिवूडचे अनेक बिग बजेट चित्रपट कलेक्शनसाठी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे नेमकं बॉलिवूडला झालंय काय असा प्रश्न अभिनेत्याने व्यक्त केला.

पटोदी कुटुंबातील नवाब अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘विक्रम वेधा’ बिग बजेट असूनही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. पाहायला गेलं तर विक्रम वेधा प्रदर्शित होण्यापूर्वी चांगलाच चर्चेत होता, अनेक चाहत्यांनी पसंती दर्शवली होती मात्र, चित्रपट सिनेमागृहात आल्यावर चांगलाच फ्लॉप ठरला. त्याशिवाय बॉिलूवडच्या अपयशावर आणि कलाकारांच्या वाढत्या मानधनवरही अभिनेतच्याने मत व्यक्त केले.

सैफ अली खान याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, “बिग बजेट चित्रपट बॉक्सऑफिवर अपयशस्वी ठरत आहे, हे खूप वाइट आहे. अभिनेत्याने आश्चर्य व्यक्त करत सांगितले की, मला या गोष्टीचा काहीच अंदाज येत नाही की, विक्रम वेधासारखा चित्रपट चांगले प्रदर्शन का करु शकला नाही? मला या चित्रपटाकडून खूप आशा होत्या, पण असे काहीच झाले नाही. आजच्या काळात कोणालाच माहीत नाही की, बॉक्सऑफिसवर कोणता चित्रपट चालेल आणि कोणता नीही.” जेव्हा अभिनेत्याला प्रश्न विचारला की, ‘बॉलिवूडचे अनेक चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलं प्रदर्शन का करत नाहीं?’; तेव्ह सैफने सांगितले की, मला माहीत नाही हे असे का होत आहे, पण या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे. लोक सतत चित्रपट बनवत आहेत. तर कालाकारांच्या मानधनात उतार चढाव होणे स्वाभाविक आहे. मात्र, काही स्टार्स खूपच मानधन घेत आहेत. स्टार्सला एवढे मानधन तर देता, पण त्याच्याबदल्याल तुन्हाला काहीच परत मिळत नाही. केवळ 2 टक्केच लोक चित्रपट पाहाण्यासाठी पैसे खर्च करतात. तेच जर 2 टक्क्यापेक्षा 20 टक्के वाढले तर इंडस्ट्री समृद्ध होइल.

 

View this post on Instagram

 

‘विक्रम वेधा’ हा चित्रपट 100 कोटी बजेटमध्ये बनला होता आणि बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने 78 कोटींची कमाइ केली. हा चित्रपट तामिळनाडु चित्रपट ‘विक्रम वेधा’चा हिंदी रिमेक होता. सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच अभिनेता प्रभास याच्यासोबत ‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये झळकणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘इतिहास माहिती नसेल तर पुस्तके पाठवतो’, छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने भडकले अमोल कोल्हे, व्हिडिओतून भाजपवर टीका
खुशखबर! सनी देओलचा ‘चुप रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ आता ‘OTT’वर येण्यास सज्ज

हे देखील वाचा