भारतीय क्रिकेटची सर्वोत्तम महिला फलंदाज मिताली राजने (Mithali Raj) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ३९ वर्षीय मितालीने ट्विटरवर याची घोषणा केली आणि लिहिले, “माझ्या करिअरला अलविदा करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटते. कारण सध्या संघ अतिशय प्रतिभावान युवा खेळाडूंच्या हातात आहे आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे.” मिताली राज ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
Thank you for all your love & support over the years!
I look forward to my 2nd innings with your blessing and support. pic.twitter.com/OkPUICcU4u— Mithali Raj (@M_Raj03) June 8, 2022
मिताली राजने निवृत्ती जाहीर केल्यापासून तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. मात्र, सर्वांचे लक्ष वेधून घेणारी कमेंट दुसऱ्या कोणाची नसून, बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taaspee Pannu) आहे. ‘शाबाश मिठू’ या चित्रपटातून मिताली राजची कथा लवकरच मोठ्या पडद्यावर घेऊन येणारी अभिनेत्री तापसी पन्नूने या मितालीचे आभार मानले आहेत. (mithali raj retirement shabaash mithu actress taapsee pannu thanked)
मिताली राजच्या पोस्टवर कमेंट करताना, तापसी पन्नूने लिहिले, “धन्यवाद हा एकमेव शब्द आम्ही म्हणू शकतो. क्रिकेटप्रेमींसाठी महिला क्रिकेट नकाशावर आणल्याबद्दल धन्यवाद!”
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीजीत मुखर्जी यांनी केले आहे. चित्रपटात तापसी पन्नूसह अभिनेता विजय राज, अजीत अंधेरे, प्रिया एवन यांनीही भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजच्या जीवनातील संघर्षावर आधारित आहे. त्याचबरोबर महिला संघाच्या जडणघडणीवरही चित्रपटात प्रकाश टाकला आहे. मिताली राजने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले पण तिने कधीही हार न मानता यशाचे शिखर गाठले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा