मिथिला पालकरचा समावेश मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत होतो. पारंपारिक लूकपासून ते अगदी बोल्ड लूकपर्यंत ती प्रेक्षकांना तिचा जलवा दाखवत असते. तिचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे, त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळत असतो. मागील काही दिवसांपासून मिथिला सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अनेक बोल्ड फोटोशूट ती सोशल मीडियावर करत असते. अशातच तिचे नवीन फोटोशूट समोर आले आहे. अशातच तिचा एक सुंदर फोटो समोर आला आहे.
मिथिलाने अलीकडेच इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही सुंदर फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिने आकाशी रंगाची साडी नेसून यावर पांढऱ्या रंगाचा ब्लाउज घातला आहे. गळ्यात एक सुंदर नेकलेस आणि केसांची पोनीटेल घातली आहे. यासोबत तिने हातात एक डिझायनर बॅग घेऊन पायात सुंदर मोजडी घातली आहे. या फोटोमध्ये ती एका खुर्चीवर बसलेली दिसत असून, ती खुर्चीवर बसून वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.
तिच्या फोटोवर तिचे अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण या फोटोवर फायर तसेच हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत. तसेच एकाने या फोटोवर “परमसुंदरी” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका चाहत्याने कमेंट केली की, “नेहमी इतकी छान कशी दिसू शकतेस.” अशाप्रकारे या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.
मिथिलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती मागील काही दिवसात ‘त्रिभंगा’ या चित्रपटात काजोलसोबत स्क्रीन शेअर करत होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला भरभरून दाद मिळाली होती. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी मिथिला ही एक आहे. मिथिलाने तिच्या करिअरची सुरुवात ‘वरुण नार्वेकर’ यांच्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटातून केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांनी काम केले आहे. यासोबतच तिने २०१४ मध्ये ‘माझा हनिमून’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे. तिने २०१८ मध्ये इरफान खानसोबत ‘कारावां’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील या दोघांच्या आंबट गोड केमिस्ट्रीने सगळ्यांना खूप हसवले तसेच भावनिक देखील केले. तसेच तिने ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात देखील काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’
-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’
-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी