हिंदी मनोरंजनविश्वातील आणि खासकरून वेबसेरीजमधील मराठमोळा अतिशय लोकप्रिय चेहरा म्हणजे मिथिला पालकर. अतिशय क्युट चेहरा, बबली व्यक्तिमत्व आणि सुंदर कुरळे केस अशी दिसणारी मिथिला आजच्या पिढीची आवडीची अभिनेत्री आहे. मिथिलाने आजवर अनेक वेगवगेळ्या आणि पठडीबाहेरील कलाकृतींमध्ये काम केले आहे. मोजक्या मात्र लक्षात राहणाऱ्या प्रोजेक्ट्समध्ये ती दिसली. आज (१२ जानेवारी) मिथिला तिचा ३० वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या काही खास गोष्टींबद्दल.
View this post on Instagram
मिथिलाचा जन्म १२ जानेवारी १९९३ रोजी मुंबईच्या एका मराठी कुटुंबात झाला. तिचा या क्षेत्रात येण्याचा कोणताच मानस नव्हता, ती नशिबाने अभिनेत्री झाले. मिथिलाचा ‘कन्फयुजींग थिंग्स ए गर्ल’ नावाने एक यूट्यूब व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ तुफान हिट झाला. त्यानंतर तिला २०१४ साली ‘माझा हनिमून’ नावाच्या एका मराठी शॉर्ट फिल्ममधे काम करायची संधी मिळाली. यातूनच तिने अभिनयात पदार्पण केले.
View this post on Instagram
पुढे २०१६ साली मिथिला यूट्यूबची सिरीज असलेल्या ‘गर्ल इन द सिटी’मधून तिला अमाप लोकप्रियता मिळाली. या सिरीजमध्ये तिने २१ वर्षाच्या मुलीची भूमिका साकारली होती. तिच्या या सिरिजला आणि मिथिलाच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ही सिरीज मिळाल्यानंतर तिला ‘लिटिल थिंग्स’ सिरीजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या सिरीजने तिच्या नशीबच पालटून टाकले. या सिरीजमध्ये ती ध्रुव सहगलसोबत दिसली. ध्रुव आणि काव्याचा या जोडीने प्रेक्षकांचे मनं जिंकले. या सिरिजला मिळालेला प्रतिसाद पाहून सिरीजचे ४ सिझन आले.
View this post on Instagram
पुढे मिथिलाने २०१५ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने कंगना रणौत आणि इमरान खान यांच्या ‘कट्टी बत्ती’ या सिनेमात तिने काम केले. या सिनेमात ती इमरान खानच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली. त्यानंतर ती इरफान खान, दुलकर सलमान यांच्यासोबत ‘कारवां’ या सिनेमात दिसली. तिने अभय देओलसोबत ‘चॉपस्टिक’मध्ये देखील काम केले असून, तिची ‘त्रिभंगा’ सिनेमातील भूमिका खूप गाजली. या सिनेमात तिने काजोल आणि रेणुका शहाणे सोबत काम केले होते.
View this post on Instagram
मिथिलाने २०१७ साली मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. तिने ‘मुरंबा’ सिनेमात अमेय वाघसोबत काम केले. या सिनेमातील तिची भूमिका आणि सिनेमा तुफान गाजला. तिला या सिनेमासाठी फिल्मफेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अमृता फडणवीसांच ‘मूड बना लिया’ गाण्याने घातलाय धुमाकूळ! पोस्ट शेअर करत म्हणाल्या, ‘जल्लोष संपण्याचं…,’
आदिलसोबत लग्नावर राखी सावंतने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘मी खूप….’