बॉलिवूडचे ‘डिस्को डान्सर’ म्हणून ओळखले जाणारे मिथुन चक्रवर्ती (mithun chakraborty) आज शुक्रवारी (16 जुन)ला त्यांचा 72वा वाढदिवस साजरा करत आहेत. अभिनेत्याचे आयुष्य नेहमीच साहसीपणाने भरलेले होते. काही हिट चित्रपटानंतर त्यांनी बरेच सलग फ्लॉप चित्रपटही दिले, तरीही त्यांचे स्टारडम कमी होऊ शकले नाही. यासोबतच त्यांनी फिल्मी कारकीर्द आणि वैयक्तिक आयुष्यात असे अनेक निर्णय घेतले ज्याला पाहून प्रत्येकाला धक्का बसला. चला तर जाणून घेऊया काय होते ते निर्णय…
श्रीदेवीसोबत केले होते गुपित लग्न
मिथुन यांनी 1976 साली ‘मृगया’ या चित्रपटापासून आपल्या फिल्मी कारकीर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला होता. यानंतर मिथुन यांनी अनेक हिट चित्रपट दिले. ते एक यशस्वी अभिनेता होते आणि म्हणूनच त्यांचे नाव सह-कलाकार रंजीता, योगिता बाली, सारिका आणि इतरांशी जोडले गेले. परंतु श्रीदेवीबरोबरचे (shridevi) त्यांचे अफेअर सर्वाधिक चर्चेत राहिले.
मिथुन-श्रीदेवी यांनी 1984 च्या ‘जाग उठा इंसान’ या चित्रपटात पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाच्या शूटिंगबरोबरच त्यांच्या अफेअरच्या बातम्याही येऊ लागल्या. मिथुन चक्रवर्ती यांनी स्वत: एका मुलाखतीत कबूल केले होते की, त्यांनी श्रीदेवीशी गुप्तपणे लग्न केले होते.
सातत्याने फ्लॉप होत राहिले 33 चित्रपट
मिथुन यांच्यासाठी सर्वात कठीण काळ 1993 ते 1998 दरम्यानचा होता. जेव्हा त्यांचे चित्रपट सतत फ्लॉप होत होते. त्यावेळी त्यांचे 33 चित्रपट फ्लॉप झाले. त्यांचे स्टारडम इतके जबरदस्त होते की, तरीही दिग्दर्शकांनी 12 चित्रपट त्यांच्या सोबत साईन केले.
नक्षलवादाशी होता संबंध
फार कमी चाहत्यांना हे माहीत आहे की, केमिस्ट्रीमध्ये पदवी घेतलेले मिथुन चित्रपटात येण्यापूर्वी त्यांची नक्षलवादी विचारसरणी होती. नंतर कुटुंबाच्या दबावामुळे त्यांनी स्वत:ला नक्षलवादापासून दूर केले आणि बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
350 चित्रपटात केलंय काम
मिथुन यांनी आतापर्यंत एकूण 350 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी ‘वारदात’, ‘अविनाश’, ‘जाल’, ‘डिस्को डांसर’, ‘भ्रष्टाचार’, ‘घर एक मंदिर’, ‘वतन के रखवाले’, ‘हमसे बढ़कर कौन’, ‘चरणों की सौगंध’, ‘हमसे है जमाना’, ‘बॉक्सर’, ‘बाजी’, ‘कसम पैदा करने वाले की’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘स्वर्ग से सुंदर’ अशा हिट चित्रपटांत काम केले आहे.
मिथुन आहेत कोट्यवधी संपत्तीचे मालक
मोनार्क हॉटेल्सच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, ऊटीमधील हॉटेलमध्ये 59 खोल्या, 4 लक्झरी सुट, हेल्थ फिटनेस सेंटर, इनडोअर स्विमिंग पूल, लेसर डिस्क थिएटर, मिड नाईट काऊ बॉय बार अँड डिस्को तसेच किड्स कॉर्नर इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.
मसिनागुरीबद्दल बोलायचे झाले, तर इथेही त्यांचे 16 बंगले, 14 ट्विन्स मचान, स्टँडर्ड खोल्या, मल्टिकझिन रेस्टॉरंट्स आणि मुलांचे खेळाचे मैदान तसेच घोडेस्वारी आणि जीप रायडिंग यांसारख्या सुविधा आहेत. याशिवाय येथे नॉन एसी मचान, बंगले आणि कॉटेज देखील आहेत.
म्हैसूरमधील हॉटेलमध्ये 18 सुसज्ज एसी कॉटेज, 2 एसी सुट, ओपन एअर मल्टीकझिन रेस्टॉरंट्स तसेच स्विमिंग पूल, पूल टेबल आणि प्रवासा संबंधित सेवा उपलब्ध आहेत.(mithun chakraborty 33 flop films and secret marriage to sridevi despite having first wife)
हेही नक्की वाचा-
–अरमान मलिकचा भाऊ देखील आहे प्रसिद्ध गायक, सलमान खानच्या ‘या’ चित्रपटात गायली आहेत गाणी
–शाहरुख खानला महिला चाहतीने जबरदस्तीने केले किस; काय म्हणाले युजर वाचा एकदा