Friday, December 8, 2023

कुस्तीपटूंच्या आदाेलनांवर मिथुन चक्रवर्तीने साेडले मौन, काय म्हणाले अभिनेता घ्या जाणून

देशात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्या निषेधावर राजकारण्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अशातच आता बॉलिवूड अभिनेता आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

खरं तर, नुकतेच मिथुन चक्रवर्ती (mithun chakraborty ) एका कार्यक्रमात गेले होते, जिथे त्यांना कुस्तीपटूंनी केलेल्या विरोधाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना अभिनेता म्हणाले, ‘लोकांकडे दयाने, प्रेमाने बघितले तर सर्व काही संपेल. मात्र, कुणीच बघायला तयारच नाही. काय करणार, आपल्या हातात काहीच नाही.’

मिथुन चक्रवर्तीच्या या उत्तरानंतर अभिनेत्याला विचारण्यात आले की, केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे असे तुम्हाला वाटते का? यावर अभिनेत्याने स्पष्टपणे सांगितले की, ‘केंद्र सरकार काहीही करू शकत नाही. केंद्र सरकारच्या हाती काहीच नाही. हे संविधानाच्या विरोधात असेल. केंद्र सरकार राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करू शकत नाही.’

विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे कुस्तीपटू गेल्या अनेक दिवसांपासून रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. कुस्तीपटूंनी ब्रिज भूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला असून लैंगिक छळ प्रकरणी सिंग यांच्या अटकेची मागणी केली आहे, परंतु अद्याप तसे झालेले नाही. या संदर्भात दिल्लीत कुस्तीपटू सातत्याने आंदोलन करत आहेत. या निषेधाबाबत आतापर्यंत अनेक टीव्ही सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत.

एक व्हिडिओ शेअर करत स्वरा भास्करने लिहिले, “लज्जास्पद आहे की, आमच्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय खेळाडूंना लैंगिक छळाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडले जात आहे आणि आरोपी भाजप खासदाराला सरकारकडून सतत संरक्षण दिले जात आहे. डिसमिस करा आणि ब्रिजभूषण सिंग यांना तपासा.” या साेबतच टोविनो थॉमस, कमल हासन, प्रकाश राज आणि सोनू सूद यांनीही पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.(bollywood actor mithun chakraborty react on wrestlers vinesh phogat and sakshi malik protest against wfi president brij bhushan sharan singh)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेता गंभीर जखमी; अभिनेत्री श्वेता मेहंदळेने दिली ‘ही’ माहिती
पंजाबी गाण्यावर विकी काैशलने लावले ठुमके, व्हिडिओ एकदा पाहाच

हे देखील वाचा