Saturday, June 29, 2024

‘वेड’ चित्रपट पाहिल्यानंतर राज ठाकरेंच्या पत्नी; जिनेलियाला म्हणाल्या, ‘दोन मुलांची आई असूनही…’

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख अवघ्या महाराष्ट्रचं फेवरट कपल आहे. नुकतंच रितेश दिग्दर्शित वेड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घालत आहे. आठवडाभरात चित्रपटाने सैराट चित्रपटाच्या कमाइला मागे टाकले आहे. मराठीच नाही तर बॉलिवूड कलाकारांनाही वेड चित्रपटाचं वेड लागलं असून मोठमोठे दिग्गज कलाकर रितेशचे कौतुक करत आहेत. अशातच मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांना देखिल वेड चित्रपटानी भुरळ घातली असून त्यांनी या जोडीचं कौतुक केलं आहे.

मराठी आणि बॉलिवूडमधील लकप्रिय जोडी जिनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) आणि रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या जोडीच्या केमिस्ट्रीने वेड लावलं आहे. त्यासोबतच जिनेलियाने तब्बल 20 वर्षानंतर अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे. राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे ( यांनी नुकतंच प्लाझा चित्रपटगृहामध्ये वेड चित्रपटाच्या शोदरम्यान हजेरी लावली होती. त्यावेळी रितेश-जिनिलीया व शर्मिला ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शर्मिला यांनी जिनिलीयाबाबत केलेलं विधान चांगल चर्चेत आलं आहे.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “देशमुख कुटुंबीय व आमचे जवळचे संबंध आहेत. अनेकदा आमच्या भेटीगाठी होत असतात. गेली अनेक वर्ष मी जिनिलीयाला पुन्हा पडद्यावर येण्याबाबत बोलत होते. मी रितेशलाही याबाबत अनेकदा बोलले होते. त्यांच्या लग्नाला आता दहा वर्षे झाली. जिनिलीया दोन मुलांची आई आहे. पण तिच्या चेहऱ्यावरुन असं वाटतच नाही की तिला एवढी मोठी मुलं आहेत.”

 

View this post on Instagram

 

शर्मिलाजी पुढे म्हणाल्या की, “जिनिलीया उत्तम अभिनेत्री आहे. ‘लय भारी’ चित्रपटात ती फक्त एका गाण्यासाठी पाहुणे कलाकार म्हणून दिसली होती. परंतु, त्याचीही दखल घेण्यास तिने भाग पाडलं. तिच्या स्माइलचे लाखो चाहते आहेत. म्हणून पुन्हा पडद्यावर येण्यासाठी मी दोघांच्याही मागे लागले होते. ‘वेड’मुळे जिनिलीया पुन्हा पडद्यावर दिसली. याचा आनंद मलाही आहे.

वेड चित्रपट (दि, 30 जानेवारी) रोजी प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाने केट्यावदीची कामाइ करण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय वेड चित्रपटाने सैराटलाही मागे टाकलं आहे. मराठी सिनेसृष्टीमधील सैरटचा रेकॉर्ड ब्रेक करणार हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! अभिजित बिचुकलेचा अपघात, रुग्णालयात दाखल
Pathaan Trailer: RRR स्टारर अभिनेत्याने शाहरुखच्या पठाणचं केलं कौतुक; म्हणाला, ‘असे अ‍ॅक्शन सीन्स…’

हे देखील वाचा