Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड Pathaan Trailer: RRR स्टारर अभिनेत्याने शाहरुखच्या पठाणचं केलं कौतुक; म्हणाला, ‘असे अ‍ॅक्शन सीन्स…’

Pathaan Trailer: RRR स्टारर अभिनेत्याने शाहरुखच्या पठाणचं केलं कौतुक; म्हणाला, ‘असे अ‍ॅक्शन सीन्स…’

शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. बेशरम रंग  प्रदर्शित झाल्यापसून वादाच्या घेऱ्यात अडकलं आहे. मंगळवार (दि, 10 जानेवारी) रोजी पठाण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. शहरुखच्या अ‍ॅक्शन आणि थ्रिलरने चाहत्यांना भुरळ घातली आहे. त्याशिवाय जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण यांचा दमदार अभिनयाची धमकही दिसून येत आहे. प्रेक्षकांचा चित्रपटाप्रती पसंती पाहूण असे दिसून येत आहे की, पठाण चित्रपटाचा वनवास संपला आहे. यावर नुकतंच साउथ सुपरस्टारर अभिनेता राम चरण याने पठाणचं कौतुक करत ट्वीट शेअर केलं आहे.

आरआरआर (RRR) चित्रपट स्टारर राम चरण (Ram Charan) हा तेलुगू इंडस्ट्रीमधील आघाडीचा अभिनेता आहे. त्याने पठाण (Pthan) चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि तो स्वत:ला चित्रपटाचं कौतुक करण्यापासून थांबवू शकला नाही. त्याने पठाण चित्रपटाचं आणि शाहरुख खान (Shaharukh Khan) धमाकेदार अभिनयाचं तोंडभरुन कौतुक करत आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन ट्वीट शेअर केलं आहे.

राम चरणने ट्वीट शेअर करत लिहिले की, “पठाण चित्रपटाच्या टीमसाठी खूप खूप शुभेच्छा! शाहरुख सर तुम्हाला याआधी कधी असे अ‍ॅक्शन सीन्स करताना पहिले नाही.” त्याशिवाय चाहत्यांना देखिल शाहरुखच्या अभिनयाला डोक्यावर घेतलं आहे. जॉन अब्राहम (John Abraham) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने देखिल कौतुकाची कामगिरी केली आहे.

पठाण चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) याने केलं आहे. पठाण चित्रपट (दि, 25 जानेवारी) रोजी चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. बेशरम रंग गाण्यापासून चित्रपट वादाच्या घेऱ्यात आला असल्याने बॉक्सऑफिसवर किती कामगिरी करेल हे पाहाणे खूप महत्वाचे ठरणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
संजय उवाच! संजय राऊत यांच्यावर बायोपिक झाल्यास कोण करणार मुख्य भूमिका? साहेब म्हणतात…
ऑस्करमध्ये ‘आरआरआर’च ठरणार बेस्ट फिल्म! हॉलिवूडच्या दिग्दर्शकाचा शब्द

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा