Friday, August 8, 2025
Home नक्की वाचा बापरे! स्विमिंग पूलमध्ये लहान मुलांसमोरच मॉडेलने काढले कपडे, टिक टॉकवर लाईव्ह करत असतानाच केला प्रताप

बापरे! स्विमिंग पूलमध्ये लहान मुलांसमोरच मॉडेलने काढले कपडे, टिक टॉकवर लाईव्ह करत असतानाच केला प्रताप

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग म्हणून ओळखले जातात. सोशल मीडियाच्या जगतात रोज अनेक नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्याची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत असते. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओची मीडिया जगतात चर्चा रंगली आहे. हा व्हिडिओ कायली स्ट्रिकलॅंड या मॉडेलचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, व्हिडिओमध्ये ही मॉडेल लहान मुलांसमोरच टॉपलेस झाल्याची माहिती समोर आली आहे, विशेष म्हणजे ही मॉडेल यावेळी लाईव्ह प्रक्षेपणही करत असल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, काईली स्टिकलॅंड ही ३० वर्षीय मॉडेल लहान मुले आणि एका महिलेसोबत स्विमिंग पूलमध्ये मजा करत होती. याचवेळी काईलीने आपल्या टिकटॉक अकाउंटवरुन लाईव्ह स्ट्रिमिंग केले. लाईव्ह स्ट्रिमिंग करतानाच तिने लहान मुलांसमोरच टॉपलेस होत मुलांचे लक्ष वेधण्याचा धक्कादायक प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. काईलीचे टिकटॉकवर २ लाख ६० हजारांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. याचवेळी केलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर तिच्यावर कारवाईही करण्यात आली आहे.

काइलीच्या लाईव्ह स्टिमिंग दरम्यान ती लहान मुले तिच्या कॅमेऱ्याकडे पाहत होती. यामुळेच तिच्यावर बाल शोषणाचा आणि पोर्नोग्राफीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल वाद झाल्यानंतर या मॉडेलने दुसऱ्याच्या मुलांची काळजी घेण्याची माझी जबाबदारी नाही असे उध्दट उत्तर दिल्याचीही माहिती समोर आली आहे. परंतु तिने वाईट हेतूने अशा प्रकारे लहान मुलांसमोर न्यूड झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा