Friday, July 5, 2024

सुष्मितासोबत लग्न करण्याच्या प्रश्नावर रोहमनचे प्रत्युत्तर; म्हणाला, ‘मी रिनी आणि अलीशाच्या वडिलां….’

कलाकार असो किंवा मॉडेल यांनी आधीपासूनच आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली असते. मात्र, जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये येतात, तेव्हा त्यांच्या प्रसिद्धीत चांगली वाढ होते. असेच काहीसे रोहमन शॉल याच्याबाबतही आहे. त्याने मॉडेलिंगमध्ये चांगले नाव कमावले आहे. परंतु सुष्मिता सेनचा बॉयफ्रेंड बनल्यानंतर त्याला जी प्रसिद्धी मिळाली, ती आधी मिळाली नव्हती. सोशल मीडियावर रोहमन- सुष्मिता नेहमीच एकमेकांचे फोटो शेअर करतात. ही जोडी पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे. या जोडीचे लाईमलाईटमध्ये येण्याचे कारणही रंजक आहे. खरं तर रोहमनने इंस्टाग्रामवर एक सेशनदरम्यान सुष्मिताच्या चांगल्या गुणांपासून ते लग्नापर्यंत अनेक खुलासे केले आहेत.

सुष्मिताचा बॉयफ्रेंड रोहमनने इंस्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनचे आयोजन केले होते. यानंतर त्याला युजर्सनी धडाधड प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने कोणालाही निराश केले नाही आणि सर्वांना मजेशीर उत्तरेही दिली.

एका युजरने त्याला विचारले की, “एका सेलिब्रिटीप्रमाणे जीवन जगणे कसे वाटते? जेव्हा तुम्ही रस्त्यांवर असेच कोणत्याही वेळी आपल्या इच्छेनुसार फिरू शकत नाहीत.” या प्रश्नाचे उत्तर देताना रोहमन म्हणाला की, “मी आतापर्यंत असे काहीच मिळवले नाही. ही इतर कोणाची मेहनत आहे, जेव्हा मी स्वत: हे सर्व करेल, तेव्हा याचे उत्तर देईल.”

एका युजरने रोहमनला सुष्मिताच्या एका चांगल्या गुणाबद्दल विचारले. यावर त्याने म्हटले की, “तिची जागरुकता.” दुसऱ्या एका युजरने विचारले की, “सुष्मिता मॅमसाठी काही सांगाल का?” यावर उत्तर देताना तो म्हणाला की, “ती खूप चांगली आहे.”

एका युजरने रोहमनला सुष्मितासोबत लग्न करण्याबाबत प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना रोहमनने म्हटले की, “मी आधीपासूनच सुष्मिताच्या कुटुंबाचा भाग आहे आणि सुष्मिताच्या मुली रिनी आणि अलीशासाठी मी वडिलांप्रमाणे आहे.” बॉलिवूडमधून मिळणाऱ्या ऑफरवर बोलताना तो म्हणाला, “मी कधीही आपल्या मनात अभिनेता बनण्याबाबत विचार केला नव्हता. मात्र, आता ऑफर मिळत आहेत, तर मी त्यावर विचार करत आहे.”

रोहमन तेव्हा चर्चेत आला होता, जेव्हा सन २०१८ मध्ये शिल्पा शेट्टी कुंद्राच्या दिवाळी पार्टीमध्ये रोहमन आणि सुष्मिता सेन एकमेकांच्या हातात हात टाकून स्पॉट झाले होते. चाहत्यांनी यावरूनच अंदाज लावला होता की, दोगेही एकमेकांना डेट करत आहेत.

हे देखील वाचा