Monday, July 1, 2024

केंद्रीय कॅबिनेटची सिनेमॅटोग्राफर बिलला मंजुरी: पायरसी रोखण्यासाठी मोठे पाऊल, कलाकार झाले आनंदित

केंद्रीय मंत्रिमंडळाने सिनेमॅटोग्राफर बिलाला मंजुरी दिली आहे. या बिलाला मिलेल्या मंजुरीमुळे आता चित्रपट जगातील लोकांनी आनंद व्यक्त केला असून, सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. सोबतच या बिलामुळे चित्रपटांचा अनुभवांना जपून ठेवत आणि पायरसीला आळा बसवता येणार असल्याचे सांगितले आहे. सूचना आणि प्रसारण मंत्री असलेल्या अनुराग ठाकूर यांनी कॅबिनेटच्या या निर्णयाची माहिती देताना हे विधेयक संसदेमध्ये येणाऱ्या सत्रात सादर करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले.

अनुराग ठाकूर यांनी सांगितले की अनेक लोकांनी, कलाकारांनी पायरसीवर अंकुश लावण्याची मागणी करत काही नयम बनवण्यास सांगितले होते. शिवाय वयानुसार चित्रपटांचे वर्गीकरण आणि आता असलेल्या काही कायद्यांमध्ये बदल करावा आदी मागण्या केल्या होत्या. आता मोदी सरकार कडून यावर दखल घेतली जात आहे. या निर्णयामुळे सिनेसृष्टीतील कलाकार खुश असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला आहे.

अभिनेता आर माधवानने ट्विट करत लिहिले, “केंद्रीय मंत्रिमंडळाने चित्रपटांच्या पायरसीवर अंकुश लावण्यासाठी सिनेमॅटोग्राफ अधिनियम १९५२ च्या संशोधनाला मंजुरी दिली आहे. हे खूप उत्तम पाऊल आहे.” तर प्रोडक्शन हाऊस असलेल्या टी-सीरीजने लिहिले, “टी-सीरीज चित्रपटांना पायरसीच्या खात्र्यापासून वाचण्यासाठी येणाऱ्या सिनेमॅटोग्राफ अधिनियम १९५२ च्या संशोधन कायदा आणि सरकारच्या या पावलाचे समर्थन करते. हे खूपच महत्वाचे आहे. यामुळे फक्त सिनेसृष्टीचा विकास नाही तर या क्षेत्रात रोजगार देखील वाढणार आहे.” यांच्यासोबत अजय देवगण, काही प्रोडक्शन कंपन्या आदी अनेकांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान या बिलामध्ये UA 7+, UA 13+ आणि UA 16+ अशा अजून काही नवीन कॅटिगरी जोडल्या गेल्या आहेत. कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर आता हे बिल संसदेमध्ये पास झाले की, पुढे चित्रपटांना मिळणाऱ्या सर्टिफिकेटमध्ये हा बदल पाहायला मिळेल. कोणत्याही परवानगीशिवाय सिनेमाची कॉपी करणारी अव्य्क्तीला तीन महिने जेल आणि सोबतच तीन लाखांचा दंड देखील होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
निधनापूर्वी सतीश कौशिक करत होते ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची तयारी सलमान खानने केला खुलासा

इरफान खान यांचा शेवटचा सिनेमा असलेल्या ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियंस’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

हे देखील वाचा