कलाकार नेहमी त्यांचा अभिनय पडद्यावर साकारताना तो अधिकाधिक खरा आणि प्रभावी वाटावा यासाठी खूप प्रयत्नशील असतात. आपल्या भूमिका सरस करण्यासाठी ते भूमिकेची गरज असणाऱ्या नवनवीन गोष्टी ते शिकतात आणि मग त्यांचे सीन्स शूट करतात. कलाकार भूमिकेच्या गरजेसाठी वेगवेगळ्या भारतीय भाषांचे प्रशिक्षण घेताना आपण अनेकदा ऐकले असेल, पाहिले असेल. मात्र भूमिकेच्या आवश्यकतेनुसार परदेशी भाषा कोणत्या कलाकाराने शिकल्याचे खूपच कमी ऐकले असेल. अभिनेता मोहित रैनाने त्याच्या आगामी ‘शिद्दत’ सिनेमासाठी एक परदेशी भाषा शिकली आहे.
पुढच्या शुक्रवारी डिज्नी प्लस हॉटस्टावर मोहित रैनाचा ‘शिद्दत’ सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधून मोहित रैनाचा प्रभावी अंदाज सर्वांचेच आणि लक्ष वेधून घेत आहे. टेलिव्हिजनपासून सुरु झालेला मोहितच्या प्रवास आज बॉलिवूडपर्यंत आला आहे. टीव्हीप्रमाणेच त्याने बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली. टीव्ही, डिजिटल आणि ता चित्रपटांमधील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून मोहित समोर आला आहे. आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय देण्यासाठी त्याने नेहमीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मोहित त्याच्या ‘शिद्दत’ या सिनेमासाठी सध्या खूप चर्चेत आहे.
मोहितने या सिनेमासाठी फ्रेंच भाषेचे धडे गिरवले आहे. मोहितने त्याच्या या भूमिकेबद्दल सांगितले, “कोणत्याही भूमिकेसाठी आपण जे करतो तेच ती भूमिका आपल्यासाठी करते. मला माहित होते की, ‘शिद्दत’साठी मला पॅरिसवासी वाटणे गरजेचे होते. त्यासाठी मला फ्रेंच येणे आवश्यक होते. मला सर्व काही योग्य पाहिजे होते. मग माझा बोलण्याचा एक्सेंट, उच्चार सर्व मला बरोबर पाहिजे होते. मी एक कलाकार आहे, आणि मी प्रेक्षकांना विश्वासाचा प्रवासच घडवू इच्छितो. मागील काही काळापासून, मोहित चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. त्याच्या अनेक वेबसिरीज प्रदर्शित होत असून, काही सिनेमे देखील प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.
‘शिद्दत’ या सिनेमात सनी कौशल, राधिका मदान, मोहित रैना, डायना पेंटी आदी कलाकार मुख्य भूमिकेत दिसत असून, हा सिनेमा एक रोमँटिक स्टोरी आहे. या सिनेमातून प्रेमाच्या मागे असणारे वेडेपण, त्रास आदी अनेक गोष्टी दिसणार आहेत. कुणाल देशमुख याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध
-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज