Friday, August 1, 2025
Home साऊथ सिनेमा दुःखद! मल्याळम अभिनेता रिजाबावा यांचे दीर्घ आजाराने झाले निधन

दुःखद! मल्याळम अभिनेता रिजाबावा यांचे दीर्घ आजाराने झाले निधन

मल्याळम चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेता रिजाबावा यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये १२० हून अधिक चित्रपट केले. त्यांनी तीन दशके पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पण वयाच्या ५४ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते रिजाबावा यांनी कोचीन येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. माध्यमांतील वृत्तानुसार, रिजाबावा कोचीन हॉस्पिटलमध्ये बराच काळ किडनीच्या आजारावर उपचार घेत होते. परंतु सोमवार (१३ सप्टेंबर) रोजी दुपारी दीर्घ उपचारानंतर त्यांचे निधन झाले.

खलनायकाच्या भूमिकांसाठी होते प्रसिद्ध
रिजाबावा यांनी आपल्या फिल्मी कारकिर्दीत अनेक मल्याळम सुपरहिट चित्रपट दिले. त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीत बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून काम केले. पडद्यावर विरोधी भूमिका साकारण्यासाठी ते प्रसिद्ध होते. ‘हरिहर नगर’ हा त्यांचा सर्वात लोकप्रिय चित्रपट आहे. या चित्रपटात त्यांनी जॉन होनईची भूमिका साकारली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन ३१ वर्षे झाली, तरी रिजाबावा यांचे चित्रपटातील नकारात्मक भूमिकेसाठी अजूनही कौतुक होते.

रंगभूमीपासून केली करिअरला सुरुवात
रिजाबावा यांनी आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली होती. त्यांचा पहिला मल्याळम चित्रपट ‘डॉ पसुपती’ हा होता. ‘हरिहर नगर’ हा रिजाबावांचा दुसरा चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी ज्याप्रकारे मोठ्या पडद्यावर आपल्या नकारात्मक व्यक्तिरेखेचे ​​चित्रण केले, त्यानंतर मल्याळम दिग्दर्शकांच्या यादीत त्यांना खलनायक भूमिकेसाठी पहिले स्थान मिळाले.

टीव्हीवरही केले काम
मल्याळम चित्रपटांमध्ये आपली छाप सोडणारे अभिनेता रिजाबावा यांनी टीव्हीवरही खूप काम केले. गेली १० वर्षे ते चित्रपटांमध्ये सक्रिय नव्हते. कारण त्यांचे संपूर्ण लक्ष त्याच्या टीव्हीवरील मालिकांवर होते. ‘पोक्कीरी राजा’मध्ये त्यांनी मोठ्या पडद्यावर एका मंत्र्याची भूमिका साकारली. तर ‘ममूट्टी’ आणि ‘सुकुमारन’ या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत होते. २०१० मध्ये त्यांना ‘कर्मयोगी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट डबिंग अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

मल्याळममध्ये पसरली शोककळा
रिजाबावाच्या निधनाच्या बातमीने मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना इनोसंट म्हणाले की, “रिजाबावा यांनी फक्त खलनायकाची भूमिका चांगली केली नाही, तर ते एक चांगले अभिनेता देखील होते. जो कोणत्याही भूमिका मनापासून साकारायचे. ते खूप चांगला माणूस होते आणि खूप चांगले कलाकार होते.”

‘या’ चित्रपटांमध्ये केलंय काम
रिजाबावा यांनी १९९० मध्ये ‘डॉ.पसुपती’ या चित्रपटातून यांच्या करिअरची सुरुवात केली. पुढे त्यांनी ‘भूमिका’, ‘कालरी’, ‘काबुलीवाला’, ‘सरोवरम’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय त्यांनी ‘नमाम जप्पीकुना विदू’, ‘शिवकामी’ असे अनेक दूरदर्शन शो केले. नायक म्हणून पदार्पण करणाऱ्या रिजाबावा यांनी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली असेल, पण ते नेहमीच चाहत्यांच्या हृदयात राहतील.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सलमान खानच्या कुटुंबीयांनी वाजत गाजत दिला दिड दिवसाच्या बाप्पाला निरोप

‘त्याच्याबरोबर’ प्रिया बापटने शेअर केला उमेश कामतसोबतच गोड फोटो, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

‘क्या खूब लगती हो!’ सिंपल आणि स्वीट लूकमधील तेजस्विनी पंडितचे आकर्षक फोटो

हे देखील वाचा