बाॅलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे माजी पती संजय कपूर यांचं नुकतंच निधन झालं. ही बातमी एकून सगळेच हादरले आहेत. हार्टअटॅक च्या झटक्याने त्यांचं अचानक निधनं झालं. करिश्मा आणि संजयने आधीच एकमेकांपासून वेगळं हाेण्याचा निर्णय घेतला हाेता. नुकतंच करिश्मा कपूरचे माजी पती आणि उद्दाेजक संजय कपूर यांचं निधनं झालं आहे. हि बातमी ऐकून सगळेचं थक्क झालेत.
पाेलाे खेळताना त्यांना हार्टअटॅक आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. संजय कपूर यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं, खासकरुन करिश्मा कपूर साेबतच्या घटस्पाेटाच्या वेळी. अशा काही बाॅलिवूड आणि हाॅलिवूडमधल्या प्रसिद्ध जाेड्यांबद्दल, ज्यांचा घटस्पाेट केवळ भावनांनी भरलेला नव्हता, तर खूप खर्चिकही ठरला.
बाॅलिवूडमध्ये परफेक्ट कपल म्हणून ओळखलं जाणारं ऋतिक राेशन आणि सुजैन खान यांनी 2013 साली मध्ये घटस्पाेटाचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, या घटस्फोटात सुजैनला सुमारे 400 कोटी रुपये मिळाले होते. आजपर्यंतचा हा बॉलिवूडमधला सर्वात महागडा घटस्फोट मानला जातो.
करिशमा आणि संजयचं यांचं लग्न 2003 साली झालं हाेतं. पण 2016 मध्ये त्यांनी एकमेकांपासून वेगळं हाेण्याचा निर्णय घेतला. त्यांच घटस्फोट खूप चर्चेत हाेतं. सांगितलं जातयं की, करिश्माला या घटस्फोटाच्या बदल्यात सुमारे 70 काेटी रुपये मिळाले हाेते. त्यानंया तर संजयने माॅडेल आणि अभिनेत्री असलेल्या प्रिया सचदेशी दुसरं लग्न केलं.
सैफ आणि अमृता यांनीची ही जोडी एकेकाळी खूप गाजली होती. पण लग्नाला 13 वर्षं झाल्यानंतर ते दोघं वेगळे झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफने घटस्फोटाच्या वेळी अमृताला जवळपास 5 कोटी रुपये दिले होते. जेफ बेजोस हॉलिवूडमधला नाही, पण त्याचा आणि मैकेंजी चा घटस्फोट जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. या घटस्फोटात मैकेंजीला जवळपास 3 लाख कोटी रुपये (38 अब्ज डॉलर्स) मिळाले. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि महागडा घटस्फोट मानला जातो.
बास्केटबाॅलचा प्रसिद्ध खेळाडू माइकल जॉर्डनला 2006 साली मध्ये घटस्फोटाच्या वेळी माेठा ताेटा सहन करावा लागला हाेता. त्याला जवळ पास 1,394 काेटी रुपये (168 मिलीयन डाॅलर्स) द्यावे लागले. त्याचबराेबर प्राॅपर्टी आणि मुलांच्या कस्टडी यासाठीही खूप पैसे खर्च झाले हाेते. हॉलिवूड अभिनेता मेल गिब्सनचा घटस्फोट खूपच चर्चेत राहिला होता. 2011 साली मध्ये त्याच्या पत्नी रॉबिन मूरला घटस्फोटाच्या बदल्यात जवळपास 3,527 कोटी रुपये (425 मिलियन डॉलर्स) मिळाले. हा घटस्फोट हॉलिवूडमधल्या सगळ्यात महागड्या घटस्फोटांपैकी एक मानला जातो.
‘ब्रॅजलिना’ म्हणून ओळखली जाणारी ही जोडी त्यांच्या घटस्फोटामुळे मिडियायात खूपच चर्चेत होती. मुलांची जबाबदारी आणि प्रॉपर्टीवरून दोघांमध्ये बराच काळ कोर्ट केस चालू होती. असं म्हटलं जातं की एंजेलिनाने घटस्फोटाच्या वेळी किमान 830 कोटी रुपये (100 मिलियन डॉलर्स) मागितले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सलमान खानपासून प्रियांका चोप्रापर्यंत, हे कलाकार करतात खाजगी जेटने प्रवास
सलमान खानपासून प्रियांका चोप्रापर्यंत, हे कलाकार करतात खाजगी जेटने प्रवास