Saturday, October 18, 2025
Home कॅलेंडर अभिनेत्री दिशा पटानीच्या ‘या’ बोल्ड आणि हॉट फोटोंची २०२०मध्ये झाली होती सर्वाधिक चर्चा! पाहा फोटो

अभिनेत्री दिशा पटानीच्या ‘या’ बोल्ड आणि हॉट फोटोंची २०२०मध्ये झाली होती सर्वाधिक चर्चा! पाहा फोटो

बॉलिवूडच्या अभिनेत्री आजही अनेक तरुणांच्या स्वप्नातील पऱ्या असतात. तिच्यासोबत एकदा तरी डेट वर जाता येईल काय? अशी अशक्य स्वप्नं मनोमन पाहत असतात. स्वप्न पाहायला काय जातंय ओ! निःशुल्क तर आहेत. आणि म्हणून आपलं बावरं मन ही स्वप्नं पाहण्याची हिंमत देतं.

अशीच एक युथ सेन्सेशन असलेली अभिनेत्री दिशा पटानीने देखील फार कमी वेळात प्रसिद्धी आणि पैसा कमावला आहे. आज तिचे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच जरी सिनेमे असले, तरीही तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

 

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी केवळ तिच्या चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासाठीच नव्हे तर तिचे उत्कृष्ट लुक्स आणि फिटनेससाठी देखील प्रसिद्ध आहे. दिशाने २०१५ मध्ये तेलगू चित्रपट लोफर मधून भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर तिने २०१६ मध्ये धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिची भूमिका फारच गाजली.

आता आपण तिच्या पुढील करियरबद्दल बोलणारच आहोत, परंतू सध्या दिशाने सरत्या वर्षांत तिचे काही सुंदर आणि हॉट फोटोज सोशल मीडियावर शेअर करत वातावरण तंग केलं होतं, ते फोटोज पाहूयात.

धोनीच्या बायोपिकमधील दिशाचं काम इतकं गाजलं की तिला पुढच्याच वर्षी इंडो-चायनीज चित्रपट कुंग फु योगामध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या चित्रपटात तिला सुप्रसिद्ध चायनीज अभिनेता जॅकी चॅन सोबत काम करण्याची संधी मिळाली. तिच्यासोबत त्या सिनेमात अमायरा दस्तुर आणि सोनू सूद हे भारतीय कलाकार देखील झळकले होते. यासोबत आपण आता दिशाचे आणखीन काही हॉट फोटोज आहेत त्याचा आनंद घ्या.

दिशाने २०१८ मध्ये बाघी-२ आणि संघमित्रा या तामिळ सिनेमांमध्ये काम केलं. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. यानंतर २०१९ मध्ये सलमान खान स्टार भारत या सिनेमात दिशा झळकली.

https://www.instagram.com/p/CJNrPECgleP/?utm_source=ig_web_copy_link

हा सिनेमा इतका काही खास चालला नाही. परंतू, या सिनेमातील दिशाने साकारलेल्या भूमिकेमुळे तिच्या चाहत्यावर्गात आणखीन वाढ झाली. दिशाने या वर्षी आणखीन काही सुंदर आणि मनमोहक फोटोज शेअर केले होते ते आपल्यासाठी.

यावर्षी सुरुवातीलाच मलंग या सिनेमात दिशा झळकली होती. या सिनेमात तिच्या सोबत आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर, कुणाल खेमु अशी भली मोठी स्टारकास्ट होती. यानंतर तिचा बाघी ३ हा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित झाला.

आता पुढील वर्षी दिशाचा सलमान खान सोबत आणखीन एक बहुप्रतिक्षित सिनेमा राधे प्रदर्शित होणार आहे. काय मग आवडली ना दिशाबद्दलची ही माहिती आणि तिचे हे फोटोज!

हे देखील वाचा