अभिषेक बच्चनला सर्वात जास्त वाटते आईची भीती; अशा दिसतात सलमान खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत ‘या’ कलाकरांच्या आई

mothers day 2021 salman khan to akshay kumar mother have you seen these bollywood actors mom have a look


दरवर्षी मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. तसे तर आपण रोजच आपल्या आईवर प्रेम करतो, परंतु मातृदिनाला विशेष महत्त्व आहे. सामान्य लोकांपासून ते बॉलिवूड सेलेब्सपर्यंत हा दिवस प्रत्येकासाठी खूप खास असतो. असे बरेच कलाकार आहेत, ज्यांच्या आईला सर्वांनी पाहिलंय, परंतु असेही कलाकार आहेत, ज्यांच्या आईबद्दल क्वचितच लोकांना माहिती असेल किंवा त्यांना क्वचितच पाहिले असेल. मातृदिनाच्या निमित्ताने, आपण बॉलिवूडच्या सुपरस्टार्सच्या आईंची ओळख करुन घेऊयात.

सलमान खान
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची आई सलमा खान खूप साध्या आहेत. सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते की, “माझी आई खूप साधी आहे आणि ती सर्वांना प्रेमाने घेऊन चालते. मला तिची प्रत्येक गोष्ट आवडते. मग ते प्रेम असो नाहीतर मार. तिचे हृदय खूप नाजूक आहे.” तसेच, सलमा केवळ कौटुंबिक कार्यक्रमातच दिसतात.

अक्षय कुमार
सुपरस्टार अक्षय कुमार त्याची आई अरुणा भाटियाच्या खूप जवळ आहे. तथापि, त्याची आई लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करते. अक्षय म्हणतो की, तो त्याच्या आईची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. अक्षयची आई निर्माता असून, हरिओम एंटरटेनमेंट कंपनीमध्ये अक्षय आणि ट्विंकलसोबत पार्टनर देखील आहे.

अभिषेक बच्चन
प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन जितका त्याची आई जया बच्चन यांच्या जवळ आहे, तो तितकाच आईला घाबरतोही. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, घरात तो सर्वांत जास्त त्याच्या आईला घाबरतो. तथापि, कधीकधी या दोघांमध्ये उत्कृष्ट केमिस्ट्री पाहायला मिळते.

अर्जुन कपूर
अर्जुन कपूर आपल्या आई मोना कपूरवर खूप प्रेम करतो. बोनी कपूरपासून विभक्त झाल्यानंतर, मोना यांनी एकटीनेच अर्जुन आणि अंशुलाला सांभाळले होते. तथापि, मोना आता या जगात नाहीत.

बॉबी देओल
बॉबी देओल त्याची आई प्रकाश कौर यांच्या अगदी जवळ आहे. तथापि, प्रकाश कौर कधीही पार्टी किंवा कार्यक्रमात दिसत नाहीत. त्या आपल्या कुटुंबासमवेत दर्जेदार वेळ घालवतात.

सैफ अली खान
सैफ अली खानची आई शर्मिला टागोर जुन्या काळातील नामांकित अभिनेत्री आहेत. सैफ त्याच्या आईच्या खूप जवळचा आहे आणि तो सर्व काही त्यांच्यासोबत शेअर करतो.

संजय दत्त
संजय दत्त प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा मुलगा आहे. तो त्याच्या आईच्या खूप जवळ असायचा. जेव्हा कर्करोगाने त्याच्या आईचे निधन झाले, तेव्हा तो नैराश्यात गेला होता.

गोविंदा
गोविंदाबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध आहे की, त्याने आपली आई निर्मला आहुजाचे कोणतेही बोलणे कधी टाळले नाही. तथापि, त्या आता या जगात नाहीत.

शाहिद कपूर
शाहिद कपूरची आई नीलिमा अझीम यांनी एकटीने आपल्या मुलाचा सांभाळ केला आणि त्याला वाढवले ​​आहे.

म्हणूनच शाहिद त्याच्या आईच्या अगदी जवळ आहे आणि तो प्रत्येक प्रकारे आईचे समर्थन करतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी भाडे देण्यासाठी नव्हते विजयकडे पैसे, आज आहे करोडो रुपयांचा मालक, ‘या’ कारणामुळे विकला होता पहिला फिल्मफेअर अवॉर्ड

-श्वास रोखून धरा! तब्बल १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री

-Mother’s Day Special: नेहापासून ते नताशापर्यंत लग्नाच्या ९ महिन्यांपूर्वीच आई बनणाऱ्या अभिनेत्री, मलायकाच्या बहिणीचाही समावेश


Leave A Reply

Your email address will not be published.