Friday, April 18, 2025
Home बॉलीवूड अबब! मौनी रॉयने बिकिनीमध्ये केला इंटरनेटवर कहर, बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले हैराण

अबब! मौनी रॉयने बिकिनीमध्ये केला इंटरनेटवर कहर, बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले हैराण

सर्वच अभिनेत्री आपल्या नवीन लूकमुळे चर्चेत असतात. नुकतेच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या अभिनेत्रींमध्ये नवीन लूकवरून चढाओढ सुरु असते. काही अभिनेत्री मेकअप, दागिने परिधान करून चमकतात, तर काहीजणी शॉर्ट कपडे आणि बिकिनीमध्ये चमकत असतात. अशात सध्या मौनी रॉय चांगलीच चर्चेत आहे.

तिने तिचे नवीन फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिने राखाडी रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तिच्या या फोटोंना भरपूर लाईक्स मिळत आहेत. मौनी नेहमीच तिच्या हटके आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. बिकिनीवरील तिचे हे फोटो पाहून तिचे चाहते पुरते घायाळ झाले आहेत. अनेक चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत हार्टचे इमोजी पाठवले आहेत. (mouni roy in a maldives state of mind posts stunning throwback pics)

तिने काही दिवसांपूर्वी तिचे काही लाल आणि हिरव्या रंगातील कपड्यांवरचे फोटो पोस्ट केले होते. तिच्या या फोटोंना सुद्धा चाहत्यांनी खूप पसंती दिली. अभिनेत्री बऱ्याचदा आपल्या नवीन लूकमध्ये आणि वेगवेगळ्या कपड्यांमध्ये जास्त दिसते. ती महागडे आणि आकर्षक अलंकार परिधान करणे शक्यतो टाळते. अलंकारांशिवाय देखील तिचे सौंदर्य खूप आकर्षक वाटते.

मौनीने २०१८ मध्ये ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अक्षय कुमारसोबत तिला पहिला चित्रपट करण्याची संधी मिळाली. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही तिची पहिली मालिका होती. यातील तिच्या भूमिकेने ती घराघरात पोहचली. त्यानंतर तिने ‘कहो ना यार है’, ‘पती पत्नी और वो’, ‘दो सहेलिया’ अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केले. ‘के जी एफ चॅप्टर १’ मध्ये देखील ती झळकली होती.’नागिन’ मध्ये तिने साकारलेल्या भूमिकेसाठी तिला इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी पुरस्कार मिळाला आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’

-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’

-केबीसी: उत्तर माहित असूनही स्पर्धक आशीष सुवर्णाने घेतली नाही रिस्क, ‘या’ प्रश्नावर क्विट करत सोडला शो

हे देखील वाचा