बॉलीवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री मौनी रॉय तिच्या अभिनयसोबतच, सौंदर्यामुळे आणि डान्समुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. मौनी रॉय नेहमी कोणत्या न कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्यामुळे ती नेहमी तिचे फोटो आणि अपडेट तिच्या फॅन्ससोबत शेयर करत असते. परंतू सध्या मौनीच्या लग्नाच्या चर्चाना खूप उधाण आले आहे.
मागील वर्ष हे कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे घरातच गेले. त्यामुळे अनेक कलाकारांचे लग्न पुढे ढकलण्यात आले. जसे २०२१ हे वर्ष सुरु झाले तसे बॉलीवूडमध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला असतांना, दुसरीकडे आता मौनीच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत.
प्राप्त माहितीनुसार मौनी लवकरच दुबई स्थित एका बॅकरसोबत लग्न करणार आहे. सूरज नांबियार असे तिच्या प्रियकराचे नाव असून तो पेशाने एक बॅकर आहे. मागील काही महिन्यांपूर्वी लॉकडाउनच्या काळात मौनी तिच्या बहिणीच्या घरी दुबईमध्ये होती. त्याचवेळी तिची आणि सूरजची ओळख झाली. सध्या हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.
साधारण दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ सुरज आणि मौनी यांच्या अफेयरच्या चर्चा समोर येत होत्या. मात्र तेव्हा मौनीने ह्या सर्व गोष्टी निव्वळ अफवा असल्याचे सांगितले होते. प्राप्त माहितीनुसार मौनी सुरजच्या आई, वडिलांच्या खूप जवळ आहे. त्यांच्या लग्नाचे हे एक मुख्य कारण आहे.
२८ सप्टेंबर १९८५ रोजी बंगालमध्ये जन्म झालेल्या मौनीचे वय आता ३५ वर्ष असून अभिनेत्री, गायक, मॉडेल व डान्सर म्हणून तीने कारकिर्द घडवली आहे.
साल २०१९ मध्ये मौनीच्या रुपाली कडयान या मैत्रिणीने तिचा आणि सुरजचा एक फोटो शेयर केला होता मात्र तो फोटो काही वेळातच तिने डिलीट देखील केला होता, त्यावरूनच यांच्या अफेयरच्या चर्चा खूप रंगल्या होत्या.
छोट्या पडद्यावर लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या मौनीने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. लवकरच मौनी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात झळकणार आहे. मौनीची गणना बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये होत आहे.