छोट्या पडद्यावर काम करणारी अभिनेत्री ‘मौनी रॉय’ हिने आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यानंतर मौनीने सुपरस्टार अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. आता बॉलिवूडमध्येही उल्लेखनीय काम करत आहे. ती आपली स्टाईल आणि लूकला घेऊन प्रेक्षकांमध्ये खूपच चर्चेत असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी तिचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या या पोस्टला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतो. चाहतावर्ग मोठा असल्यामुळे तिचे व्हिडिओ व्हायरल व्हायला काही सेकंदही पुरेशे असतात.
मौनीने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला प्रेक्षकांकडून भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओमध्ये मौनी एका वाघाला दोरीने ओढताना दिसत आहे. तिचा हा धाडसी व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
मौनी रॉयने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पिंजऱ्यातील वाघाने एका बाजूने दोरी पकडली आहे, आणि दुसऱ्या बाजूने मौनी ती दोरी ओढत आहे. मौनीने हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असे लिहिले आहे की, “शप्पथ मी हे कृत्य केले आहे.” मौनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे
मौनी रॉयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘लंडन कॉन्फिडेन्शिअल’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील तिची अक्टिंग आणि तिच्या पात्राला प्रेक्षकांकडून खूपच पसंती मिळत मिळाली, तसेच ती लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात निदर्शनास येणार आहे. मौनीने ‘क्यूकी सास भी कभी बहू थी’ या सीरियलमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले, तसेच अक्षय कुमारचे ‘गोल्ड’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…