Saturday, June 29, 2024

सुनील शेट्टीचा लेक पदार्पणातच करतोय धमाल, ‘तडप’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

अभिनेता सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) मुलगा अहान शेट्टीने (Ahan Shetty) बॉलिवूड पदार्पण केले आहे. त्याचा ‘तडप’ (Tadap) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुनीलने आपल्या मुलाच्या भव्य पदार्पणासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. ‘सूर्यवंशी’, ‘बंटी और बबली २’, ‘सत्यमेव जयते २’ आणि ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ नंतर, मिलन लुथरिया दिग्दर्शित ‘तडप’ चित्रपट जगभरात १६०० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती. चित्रपटाच्या गाण्यानंतर आणि ट्रेलरनंतर, ‘तडप’ला पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रेम मिळाले आहे. पहिल्याच दिवशी अहानचा धमाका पाहून आगामी काळात अहान बॉलिवूडमध्ये धमाका करेल, असा अंदाज चित्रपट निर्माते लावत आहेत.

पहिल्या दिवशी किती केली कमाई
अहान आणि तारा सुतारिया यांच्या ‘तडप’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे ४.३० कोटींची कमाई केली आहे, जी शानदार आहे. पहिल्या दिवसानुसार तो चांगला आकडा मानला जात आहे.

शनिवार व रविवार आव्हान
सलमान खान आणि आयुष शर्मा यांचा ‘अंतिम’ सध्या चित्रपटगृहात असल्यामुळे चित्रपट समीक्षक याला सर्वोत्तम मानत आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटगृहांमध्ये ‘तडप’ पाहणे ही मोठी गोष्ट आहे, पण चित्रपटाचे खरे आव्हान या वीकेंडला असेल.

सन २०२१ ची तिसरी सर्वात मोठी सुरुवात
जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते २’ने पहिल्या दिवशी केवळ २ कोटींची कमाई केली. त्याचवेळी, सलमानच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ ४.७५ कोटी कमावले. या सर्व गोष्टी आणि नवीन स्टारकास्ट पाहता ‘तडप’ची पहिल्या दिवसाची कमाई लक्षणीय असल्याचे बोलले जात आहे. ‘तडप’ हा २०२१ सालातील तिसरी सर्वात मोठी सुरुवात आहे.

‘तडप’ हा ‘आर एक्स १००’ चा आहे रिमेक
अहान शेट्टी आणि तारा सुतारिया यांचा ‘तडप’ हा सुपरहिट चित्रपट ‘आर एक्स १००’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात अहान शेट्टीसोबत तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहे. साजिद नाडियादवाला निर्मित, रजत अरोरा लिखित आणि मिलन लुथरिया दिग्दर्शित हा चित्रपट फॉक्स स्टार स्टुडिओद्वारे प्रस्तुत आणि सह-निर्मित आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigg Boss 15: प्रतीक सहजपालवर भडकली तेजस्वी प्रकाश; म्हणाली, ‘सांगू का, टास्कमध्ये तुझे हात कुठे कुठे लागतात?’

-गेल्या दोन वर्षांपासून ‘या’ आजाराशी झुंज देतेय राणी चॅटर्जी, पोस्ट शेअर करत मांडली व्यथा

-‘तडप’मध्ये अहान शेट्टीच्या दमदार अभिनयाची जादू, ईशाना- रमिसाच्या केमिस्ट्रीने जिंकली चाहत्यांची मने

हे देखील वाचा