Saturday, April 20, 2024

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आधारीत असे पाच चित्रपट, जे प्रत्येक शिवप्रेमीने पाहिलेच पाहिजेत

शुक्रवारी  छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रासह देशात अतिशय हर्षोल्हासाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या भीतीमुळे यावर्षी सार्वजनिक पद्धतीने जरी शिव जयंती साजरी करण्यावर बंधने असली तरी महाराजांच्या मावळ्यांचा उत्साह तेवढाच होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांचे कर्तृत्व, त्यांच्या मावळ्यांची शिवभक्ती सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी मराठीसोबतच हिंदीमध्ये महाराजांवर आधारित अनेक सिनेमे आणि मालिका काढण्यात आल्या. अगदी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या जमण्यापासून ते मागच्यावर्षी प्रदर्शित झालेल्या तानाजी पर्यंत अनेक सिनेमांनी महाराजांच्या शौर्याला मोठ्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. यानिमित्ताने शिवजयंतीचे औचित्य साधून या लेखातून जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांची नावे जाणून घेणार आहोत.

छत्रपती शिवाजी :
भालजी पेंढारकर दिग्दर्शित १९५२ साली आलेला हा सिनेमा महाराजांच्या पराक्रमावर आधारित आहे. या सिनेमात चंद्रकांत मांढरे यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. हा सिनेमा त्याकाळी खूप हिट झाला होता.

कल्याण खजिना :
१९२४ साली बाबूराव पेंटर दिग्दर्शित हा सिनेमा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी लुटलेल्या कल्याणच्या खजिन्याच्या प्रसंगावर आधारित आहे.

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय :
महेश मांजरेकरांचा हा सिनेमा २००९ साली प्रदर्शित झाला होता. यात एक मध्यमवर्गीय परिवार अन्यायाला शिवाजी महाराजांच्या तत्वांनी कसे विरोध करतात, याचे सुंदर चित्रण यात आहे.

फर्जंद :
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फर्जंद हा सिनेमा २०१८ साली प्रदर्शित झाला होता. महाराजांचे सरदार कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळा किल्ला मिळवण्यासाठी मोजक्या मावळ्यांच्या साथीने दिलेल्या झुंजीची कथा या सिनेमातुन दाखवली आहे.

फतेशिखस्त :
२०१९ मध्ये दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित असलेल्या ह्या सिनेमातून महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा आणि मराठय़ांच्या गनिमी गाव्याच्या युद्धनीतीची मांडणी सांगणारी कथा दाखवण्यात आली आहे.

तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ :
२०२० साली आलेल्या ओम राऊत दिग्दर्शित ह्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. अजय देवगणने यात तान्हाजीची भूमिका साकारली होती. कोंढाणा किल्ला जिंकणाऱ्या तान्हाजीची शौर्यगाथा या सिनेमातून दाखवली आहे.या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकर यांनी केली आहे.

राजा शिवछत्रपती :
२००८ साली आलेल्या राजा शिवछत्रपती या मालिकेने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या ह्या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराजांची भूमिका साकारली होती.

स्वराज्य रक्षक संभाजी :
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र असणाऱ्या संभाजी महाराजांवर ही मालिका होती. महाराजांनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्य कसे सांभाळले त्यावर ही मालिका आधारलेली होती. ही मालिका २०१७ साली सुरु झाली होती. या मालिकेत महाराजांची भूमिका शंतनू मोघे यांनी साकारली होती.

स्वराज्य जननी जिजामाता :
महाराजांना स्वराज्याचे बाळकडू देणाऱ्या जिजाऊंच्या आयुष्यावर ही मालिका भाष्य करते. यात अमोल कोल्हे महाराजांची भूमिका निभावत आहे. सोनी मराठीवर ही मालिका सुरु आहे.

 

 

हे देखील वाचा